बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करा- जिल्हाधिकारी यांना बिरसा फायटर्सचे निवेदन*




*बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करा- जिल्हाधिकारी यांना बिरसा फायटर्सचे निवेदन* 

नंदूरबार प्रतिनिधी: जिल्ह्यात वाढत्या हिस्त्र प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाने तात्काळ उपाययोजना करा,बिबट्याचा बंदोबस्त करा,अशी मागणी बिरसा फायटर्स  नंदूरबार संघटनेने जिल्हाधिकारी नंदुरबार मित्ताली शेठी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,वनसिंग पटले,हान्या पटले,जयसिंग वसावे,ननू भंडारी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                   तळोदा, शहादा, अक्कलकुवा  परिसरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्याचा वावर वाढून मानवावर हल्ले वाढले आहे.रोझवा प्लॉट ता.तळोदा येथे ४-५ वर्षीय बालिकेवर हल्ला केल्याने मृत्यू झाला.शहादा तालुक्यातील ईस्लामपूर येथे ५ दिवसांपूर्वी एका युवकाचा संशयास्पद मृतदेह शेतात सापडला.काही दिवसापूर्वी आजीसह नातूचा हल्ल्यात मृत्यू झाला.परिसरात गेल्या आठवड्याभरात बिबट्याचा हल्ल्यात तिघांच्या जीव गेला.तेव्हा तीन बिबट्या पकडण्यात आले. परंतु,त्यातील एकच बिबट्या नागपूर अभयारण्यात घेऊन गेले.पकडलेले दोन बिबट्या गेले कुठे?वन विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.वारंवार  घडत असलेल्या दु:खद घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.भीतीमुळे शेतातील कामही होत नाही.परिसरात नागरिकांना दररोज बिबट्ये दिसत आहे.बाहेरून नरभक्षक १५ ते २० बिबटये परिसरात सोडले असण्याची शक्यता आहे.वाढते हल्ले तात्काळ रोखण्यासाठी वन विभागाने २० ते २५ पिंजरे लावून बिबट्याना पकडून लांब अभयारण्यात सोडण्यात यावे.ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे व हल्ल्यातील मृत्यू परिवाराला आर्थिक मदत तात्काळ मिळावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने