*मंत्री डॉ.विजयकुमार गावित आयोजित प्रकाशा आणि जयनगर येथील नोंदणी शिबिराचा 2 हजारहून अधिक ज्येष्ठांनी घेतला लाभ*
नंदुरबार-महाराष्ट्राचे आदिवासी विकासमंत्री नामदार डॉ.विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतून नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना लाभ देता यावा यासाठी शहादा तालुक्यातील प्रकाशा आणि जयनगर येथे आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या नोंदणी शिबिरात शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून वृद्ध नागरिकांनी नोंदणी केली. जवळपास 2000 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी या नोंदणीचा लाभ घेतला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे लाभ देण्यासाठी हे नोंदणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. महाराष्ट्राचे आदिवासी विकासमंत्री नामदार डॉ.विजयकुमार गावित मा.खासदार डॉ.हिनाताई गावित जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरात प्रकाशालगतच्या आणि जयनगर लगतच्या गावांमधील शेकडोच्या संख्येने जेष्ठ नागरिकांनी गर्दी केली. आदिवासी विकासमंत्री नामदार डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांमुळे इतक्या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येकापर्यंत पोहोचतो यावर अनेक उपस्थित ग्रामस्थांनी समाधान आणि कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नंदुरबार जि.प.बांधकाम सभापती हेमलता शितोळे,भाजपा तालुकाध्यक्ष जे एन पाटिल,जि.प.माजी उपाध्यक्ष रामचंद्रभाई पाटील,ज्येष्ठ नेते डॉ.कांतीलाल टाटीया,के डी नाईक,धनराज आप्पा,विजय पाटील,ईश्वर माळी,रामराव बोरसे,शशिकांत शितोळे यांच्यासह स्थानिक सर्व गावांचे सरपंच,जि.प.सदस्य,पं.स.सदस्य आणि पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी प्रमुख भाषणात सांगितले की,शेतकरी कामगार महिला आणि बेरोजगार युवक असा कोणताही घटक राहिलेला नाही ज्यांच्यासाठी महायुती सरकारने योजना दिलेल्या नाही. आता विद्यमान स्थितीत सुद्धा शेतात चालणाऱ्या वीज पंपाचे बिल माफ करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आणि त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील 45 हजार 565 शेतकऱ्यांना 684 कोटी 98 लाख रुपयांचे थकीत वीज बिल माफ करण्यात आले आहे. त्याचबरोबर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना देखील थकीत वीज बिल माफीचा लाभ व्हावा आणि त्यांची कर्जातून मुक्ती व्हावी म्हणून आपण प्रयत्न केल्याने नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील सुमारे 12000 हून अधिक शेतकऱ्यांना सुमारे 225 कोटी रुपयांचे वीज बिल माफ करून मिळाले आहे. नंदुरबार तालुक्यातील शेती विकासाच्या दृष्टीने हे सर्वात मोठे पाऊल आहे. नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील सुमारे एक लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ आपण मिळवून दिला. नंदुरबार मतदार संघातल्या जास्तीत जास्त वयोवृद्ध लोकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा आणि वयोश्री योजनेचा लाभ देता यावा म्हणून आपण भव्य नोंदणी शिबिर घेतले. वैयक्तिक आणि सामूहिक लाभ देणारे असे काम आपण यापुढेही करत राहू असे मी अभिवचन देतो,असेही मंत्री गावित म्हणाले. संसदरत्न मा.खासदार डॉ.हिनाताई गावित यांनी देखील विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा आढावा मांडला.
