दोंडाईचा शहरातील राष्ट्रीयकृत बँका वरवाडे भागात उपशाखा, सी. एस .सी .सेंटर सुरू करून ए टी एम सेवा कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली.* धुळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे नाजीम शेख व पदाधिकारी यांनी केली आहे* दोंडाईचा : (मुस्तूफा शाह)




*दोंडाईचा शहरातील राष्ट्रीयकृत  बँका  वरवाडे भागात  उपशाखा, सी. एस .सी .सेंटर सुरू करून ए टी एम सेवा कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली.*

धुळे जिल्हाध्यक्ष   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे नाजीम शेख व पदाधिकारी यांनी केली आहे* 

दोंडाईचा : (मुस्तूफा शाह)
शहराचा विस्तार नंदुरबार रोड येथील डी.जी.नगर ते मोहम्मदीया नगर पर्यत  तीन ते चार कि.मी.पर्यंत विस्तार झालेला आहे. दोंडाईचा शहराच्या मध्यवर्ती भागातून अमरावती नदी मुळे शहराचे समान दोन भाग झाले आहे. अमरावती नदीच्या पश्चिमेकडे शहराचा जेवढा विस्तार आहे तेवढाच अमरावती नदीच्या पूर्वेकडे आहे.पूर्वेकडील परिसराची ३५ ते ४० हजार लोकसंख्या आहे तेवढीच पश्चिमेकडे आहे. परंतु सर्व राष्ट्रीयकृत बँका पश्चिमेकडील परिसरात आहे .ए टी एम सेवा देखील शहराच्या पश्चिम भागात आहेत. त्या मुळे बैंक अथवा ए.टी.एम.साठी लोकांना किमान दोन ते तीन कि.मी. अतंरावर जावे लागते  त्यामुळे जेष्टनागरीक व माता बघनी  यांना मोठी असुविधा होते या साठी दोंडाईचा शहराची पन्नास टक्के लोकसंख्या असणारे वरवाडे परिसरातील नागरिकांसाठी बैंकीची एक शाखा किंवा सी.एस.सी सेंटर वरवाडे भागात सुरू करणे आवश्यक आहे. रात्री अपरात्री ए.टी.एम मधून पैसे काढण्यासाठी लोकांना दोन ते तीन कि. मी. अतंर जाण्यासाठी व पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी असुरक्षितता वाटणार नाही. या सर्व बाबींचा विचार करणे आवश्यकता आहे तरी स्टेट बँक ऑफ ईंडिया, बैंक ऑफ बडोदा, युनियन बैंक ऑफ इंडिया या बैंकी ची उप शाखा,सि ए.सी सेंटर व ए. टी.एम सेवा कार्यान्वित करण्यात यावी या करीता स्टेट बँक ऑफ ईंडिया चे मॅनेजर निलेश मयेकर, बैंक ऑफ बडोदा चे मॅनेजर रविंद्र पाटील, योगेंद्र वागडे,  युनियन बैंक ऑफ इंडिया चे मॅनेजर समीर धरूड यांना निवदेन देऊन मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे धुळे जिल्हाध्यक्ष नाजीम शेख,राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हा सरचिटणीस मोहसिन शेख,  शहराध्यक्ष रईस सलीम शेख, कार्याध्यक्ष रियाज मिर्झा,  उपाध्यक्ष अयाज बेग, तालुका कार्याध्यक्ष अश्पाक मन्यार, शरीफ शेख, जिल्हा सरचिटणीस अकबर अली सैय्यद, मोहसिन शाह,अरबाज शेख व नागरिकांना कडून होत  आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने