शिरपूर शहरात भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा विशाल मोर्चा विविध मागण्यांचे निवेदन सादर आम्हाला आमच्या हक्काचे मानधन द्या.
शिरपूर-- महाराष्ट्रात असंघटित कामगारांचे,योजना कर्मचाऱ्यांचे प्रश्न अतिशय तीव्र आहेत आणि त्यांच्या प्रश्नांकडे शासन सतत दुर्लक्ष करीत आहे .आपल्या तीव्र प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि आपले हक्काचे मानधन मिळवण्यासाठीआशा व गटप्रवर्तकांनी दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी रामदेव बाबा मंदिर आमोदे येथून मोर्चास सुरुवात करून प्रांत कार्यालयावर विशाल मोर्चा आणला.मा . प्रांत अधिकारी सो, तसेच मा. गटविकास अधिकारी सो , मा. तालुका वैद्यकीय अधिकारी सो. यांना निवेदन देण्यात आले.महाराष्ट्रातील सर्व महिला या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत असे सांगितले जाते आणि याच बहिणी जेव्हा गाव पातळीवर काम असतात आरोग्याच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवितात त्या आशा गटप्रवर्तकांना हक्काचे मानधन मिळत नाही. मग आम्ही काय मा. मुख्यमंत्री साहेबांच्या सावत्र बहिनी आहोत का असा प्रश्न सर्व अशा व गटप्रवर्तकांच्या मनात निर्माण होत आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब सभेत सांगताहेत आम्ही आशांना 5000 रुपये मानधन वाढ केली. आणि दुसरीकडे परिपत्रक काढले जात आहे 18 कामांवर आधारित मोबदला 5000 रुपये मिळेल. मुख्यमंत्री साहेबांना मानधन वाढ आणि कामावर आधारित मोबदला यातील फरक कळतोय का असाही प्रश्न आम्हाला निर्माण होत आहे. अठरा कामांवर आधारित वाढीव मोबदला पाच हजार रुपये हे परिपत्रक त्वरित रद्द करून चार कामांवर आधारित मोबदला पाच हजार रुपये द्यावे ही आमची प्रमुख मागणी आहे. गटप्रवर्तकांना देखील दहा हजार रुपये मंजूर करण्याचे आश्वासन देऊन तुटपुंजी मानधनात वाढ केली. हा देखील गटप्रवर्तकांवर केलेला अन्याय आहे. याची दखल शासनाने लवकरात लवकर घेऊन गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढ करावी. ही देखील आमची प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकारने 2017 पासून आशा व गटप्रवर्तकांच्या मानधनात कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही तरी त्वरित मानधन वाढ करण्यात यावी. आशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. किमान वेतन लागू करावे. आशा व गटप्रवर्तकांना भाऊबीज भेट द्या. अशा गटप्रवर्तकांना मिळणारे मानधन हे दर महिन्याच्या एक तारखेला द्या. अशा विविध मागण्या घेऊन आजच्या आंदोलनात सर्व आशा व गटप्रवर्तकांनी सहभाग घेतला.
यावेळी आशा गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. हिरालाल परदेशी, तालुका अध्यक्ष अरुणा सूर्यवंशी, कार्याध्यक्ष स्मिता दोरीक, उपाध्यक्ष मालती इंदवे, आशा मैराळे, सल्लागार ॲड रोशन परदेशी ॲड. संतोष पाटील संघटक लक्ष्मी पावरा, कोषाध्यक्ष छाया चव्हाण, आशा वडवी, सचिव ठगु बुवा, स्वाती बडगुजर, गटप्रवर्तक आक्का पावरा, पुष्पाताई पाटील, प्रतिभाताई पाटील, आशा सरोज पाटील, रत्नाबाई पाटील, मीनाक्षी पावरा, अलका पाटील, सविता धर्माधिकारी, अनुपमा पाटील,ज्योती पाटील, अनुराधा पाटील,भाग्यश्री, ललिता पाटील सुशीला पावरा,भारती पावरा,भागवती पावरा तसेच असंख्य आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.

