शेतकर्यांच्या वीज पंप चोरणारी टोली दोडाईचा पोलीसांनी केली जेरबंद**
दोंडाईचा (अख्तर शाह)
दि. २ रोजी सायंकाळी ७ वाजेचे सुमारास दोंडाईचा पोलीस ठाणे येथे हर्षल संजय पाटील (२०) रा- बाम्हणे यांनी पोलीस ठाणे येथे येवुन फिर्याद दिली की, त्यांचा शेत गट नंबर ९७ येथील विहीरीतील ५ हॉर्स पावरची इलेक्ट्रीक मोटार ही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी शेताचे बांधावर मोटार सायकलवर येऊन विहीरीतील मोटार वर काढुन तिला जोडलेला काळ्या रंगाचा पाईप कापुन ६० फुट लांबीच्या केबलसह
चोरुन नेलेली आहे. यानंतर पोलीसांनी सदर गुन्हयातील मोटार व सदर मोटार आरोपीत यांचा शोध दोंडाईचा इलेक्ट्रीक चोरुन नेणारे पोलीस ठाणे हददीतील बामतीदारांमार्फत माहीती घेणेसाठी गोपनीय काढली दिपक गावातील शेतातील असता बाम्हणे येथील शिवाजी पाटील हा बाम्हणे लोकांना कमी किंमतीत विहीरीवर बसविल्या जाणाऱ्या इलेक्ट्रीक मोटार विकत ऑफर देत आहे. अशी देण्याची माहिती मिळाल्याने सदर इसमास ताब्यात
घेऊन त्याचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने सविस्तर विचारपुस केली असता त्याने त्याचा साथीदार अनिल ऊर्फ दादु पाटील, सुनिल भिल रा बाम्हणे, तन्वीर करीम खाटीक रा गरीब नवाज कॉलनी दोंडाईचा, अशांनी मिळून केलेली असल्याबाबत सांगितले असता त्याने सांगितलेले इतर आरोपीत यांचा त्यांचे राहते घरी जाऊन शोध घेतला असता तन्वीर खाटीक हा मिळुन आलेला असुन आरोपीत दिपक शिवाजी पाटील व तन्वीर करीम खाटीक यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली. अनिल ऊर्फ दादु पाटील, सुनिल भिल दोन्ही फरार झालेले आहेत.
याचेकडुन एकुण ०८ इलेक्ट्रीक मोटार पंप जप्त करण्यात आलेल्या असुन आरोपी तन्वीर करीम खाटीक याचेकडुन त्यांनी गुन्हयात चोरी करण्यासाठी वापरलेली हिरो कंपनीची एच.एफ डीलक्स मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे. एक हिरो कंपनीची एच. एफ डीलक्स काळ्या रंगाची मोटार सायकल. इतक्या किंमतीचा मुददेमाल हा गुन्हयात जप्त करण्यात आलेला आहे. असुन सदर गुन्हयातील फरार आरोपीत यांचा शोध पोलीस घेत असुन सदर आरोपी मिळुन आल्यास त्यांचेकडे आणखी चोरीच्या इलेक्ट्रीक मोटार पंप मिळुन येण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई
पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस ठाणे नेमणुकीचे पोउपनिरीक चांगदेव हंडाळ, हेमंत राऊत, नकुल कुमावत, असई राजन दुसाने, पोहेकॉ सुनिल महाजन, प्रविण निंबाळे, पुरुषोत्तम पवार, हिरालाल सुर्यवंशी, अक्षय शिंदे, अनिल धनगर, प्रविण निकुंभे, हर्षल सोनवणे, हर्षल बागुल, सागर कोळी, शुभम चित्ते यांनी केली सदर गुन्हयाचा पुढील तपास
पोउपनिरीक चांगदेव हंडाळ हे करीत
आहेत.
शेतकऱ्यांचे वीज पंप चोरणारी टोळी दोंडाईचा पोलीसाच्या ताब्यात; दोघाना अटक दोघे फरार.
