*ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कडून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन!!*
*2024 - 25 चा ज्ञानदीप आदर्श शिक्षक व ज्ञानदीप सेवा पुरस्काराचे सप्टेंबर मध्ये वितरण*
ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी ता.शिरपूर जि.धुळे (महाराष्ट्र) यांच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा " गुरु स्मृतिदिन निमित्त"
*ज्ञानदीप आदर्श शिक्षक* पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत
गुरुजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ सलग 12 वर्षांपासून अविरतपणे उपक्रमातून तालुक्यातील कुरखळी येथील ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी ता शिरपूर जिल्हा धुळे, हि सेवाभावी संस्था गेल्या बारा वर्षापासून संस्थेचे प्रेरणास्थान स्व.दिपक मोरे गुरुजी यांच्या कार्याला व विचारांना डोळ्यासमोर ठेवून समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना व ज्ञानदानाचे आदर्श काम करणाऱ्या गुरुजनांना दरवर्षी 12 सप्टेंबर ला सन्मानित करीत असते. यावर्षी सुद्धा *ज्ञानदीप आदर्श शिक्षक 2024* पुरस्कारासाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहे 'ज्ञानदिपक आदर्श शिक्षक पुरस्कार"सन्मान सोहळ्यात ट्रॉपी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असून, शिरपूर तालुक्यातील ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी या संस्थेच्या वतीने दिला जाणार मानाचा " ज्ञानदीप आदर्श शिक्षक पुरस्कार" साठी सर्व शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
सदर प्रस्तावातुन उपक्रमशिल शिक्षकांच्या निवड करण्यासाठी ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानकडून निवड समिती गठीत करुन आलेल्या पुरस्कारांची छाननी करून खालील प्रमाणे पुरस्कार देण्यात येतील.
*वेगवेगळ्या व्यवस्थापनाच्या शाळासाठी एक पुरस्कार अशा पद्धतीने सहा पुरस्कार हे देण्यात येणार आहेत यासाठी खालील व्यवस्थापनातील काम करणारे शिक्षकांनी प्रस्ताव पाठवावे*
1) व्यवस्थापन जिल्हा परिषद शाळा
2) व्यवस्थापन नगरपरिषद शाळा
3) व्यवस्थापन खाजगी प्राथ/माध्य शाळा
4) व्यवस्थापन इंग्रजी माध्यमाच्या शाळा
5) व्यवस्थापन उर्दू माध्यमाच्या शाळा
6) क्रीडा शिक्षक / कलाशिक्षक
तसेच वैद्यकीय, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, रुग्णसेवा, पत्रकारिता ईत्यादी क्षेत्रात अतुलनीय व सेवाभाव म्हणून काम करणार्या व्यक्तींचा ही यावेळी *ज्ञानदीप सेवा पुरस्कार* देवून सन्मान करण्यात येणार आहे.
ज्ञानदीप आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत दिनांक:- 1.9.2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल.
तसेच सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी ऑफलाइन प्रस्ताव फाईल खालील दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधून वेळेत सादर करावेत*
*अध्यक्ष व सचिव*
ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी तालुका शिरपूर जिल्हा धुळे
योगेश्वर मोरे- अध्यक्ष- 97674 66230
मनोहर वाघ- कार्याध्यक्ष- 9763236070
पुरस्कार संस्थेकडून एक लिंक देण्यात आली आहे त्यांनींवर क्लिक करून पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत
https://surveyheart.com/form66bf9789ec9174452ba0bc05
