हर घर तिरंगा अभियानांतर्गत शिरपूर प्रशासनामार्फत बाईक रॅली
शिरपूर - हर घर तिरंगा अभियानांतर्गत शिरपूर प्रशासनामार्फत 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास शहरातून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली.१५ ऑगस्टच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये महसूल शासनाकडून सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यानंतर्गत तिरंगा रॅलीचे तहसील कार्यालय, नगरपालिका शहर पोलीस स्टेशन,पंचायत समिती मार्फत आयोजन करण्यात आले.सदर बाईक रॅली तहसील कार्यालयात शिरपुर उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे,तहसीलदार महेंद्र माळी,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,पंचायत समितीचे बीडीओ संजय सोनवणे यांनी रॅलीस सुरवात केली.सदर रॅली ही तहसील कार्यालय,कुंभारटेक, मारवाडी गल्ली,पाच कंदील, गुजराती कॉम्प्लेक्स,मांडळ रोड,करवंद नाका मार्गे नगरपालिका कार्यालयात समारोप करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली.सदर रॅलीत प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय,नगरपालिका कार्यालय,शहर पोलीस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय येथील सर्व अधिकारी व कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते.
