*९ ऑगस्ट - जागतिक आदिवासी दिन*
*आदिवासी हाच*
*वनसंपत्तीचा खरा रक्षणकर्ता*
✍️लेखक रणवीरसिंह* *राजपूत*
मित्रहो,आदिवासी-वनवासी हेच खरे जंगलं-अभयारण्यांचे म्हणजे वनसंपत्तीचे रक्षक आहेत.हा समाज अतिशय शांतताप्रिय असून,निसर्गाच्या सानिध्यात राहणारा,निसर्गावर प्रेम करणारा अन् निसर्गाचे रक्षण व संवर्धन करणारा मागास ०समूह आहे.आदिवासी हा आर्थिकदृष्ट्या जरी कमकुवत घटक असला तरी,तो मनाने श्रीमंत असतो.आदिवासी स्त्री-पुरुष हे स्वभावाने साधे-भोळे अन् स्वच्छ मनाचे असतात.मात्र ते धनुर्विद्यामध्ये तरबेज असतात.वास्तविक पहाता,आदिवासी हा जल,जंगल व जमीन यांचा रक्षणकर्ता आहे.त्यामुळे
वनसंपदेचे रक्षण अन्
संवर्धन होऊन त्यासह पर्यावरणाचा समतोलही साधला जात आहे.
ऐवढं मोठं कार्य हा आदिवासी समूह अखिल मानवजातीच्या हितासाठी व त्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी अखंडपणे करत असतो.म्हणूनच तो खऱ्या अर्थाने परोपकारी आहे,हे सिद्धीस येते.
तथापि,दैनंदिन जीवनात या वनवासी समाजाला उदरनिर्वाहसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.त्यामुळे अन्य जातींच्या तुलनेत त्याची आजमितीपर्यंत पाहिजे तेवढी उन्नती झालेली दिसत नाही.या पार्श्वभूमीवरच *युनो* या जागतिक संघटनेने जगात राहणाऱ्या आदिवासींच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकण्याच्या व ते सोडविण्याच्या उद्देशाने *९ ऑगस्ट* हा दिवस *जागतिक आदिवासी दिन* म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार ९ ऑगस्ट १९९५ रोजी पहिला जागतिक आदिवासी दिन विश्वात साजरा झाला.
त्या अनुषंगानेच महाराष्ट्र सरकारनेही ९ ऑगस्ट हा दिवस राज्यात *आदिवासी दिन* म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. कारण तो महाराष्ट्राच्या वन संपत्तीचा आणि त्यातील वन्य प्राण्यांचा रक्षक व संवर्धक आहे.
शिवकालिन काळात तसेच अन्य कालखंडात आदिवासी समाजात काही शूरवीर लढवय्ये होऊन गेलेत,त्यात मुख्यत: एकलव्य,बिरसा मुंडा,तंट्या भिल,राघोजी भांगरे,राया ठाकर,किल्लेदार खेवजी गोडे,किल्लेदार खेमाजी
रघतवान,किल्लेदार बुधाजी भालचिम,हुतात्मा नाग्या महादू कातकरी,समशेरसिंग पारधी,वकील पारधी आदींचा समावेश आहे.मेवाडचे
*महाराणा प्रताप* एवं स्वराज्य संस्थापक *छ्त्रपती शिवाजी महाराज* यांना रणभूमीवर वनवासींनी वेळोवेळी आपल्या धनुर्विद्याच्या बळावर
मोलाची मदत केल्याची इतिहासात नोंद आहे.शिवरायांचे काही किल्लेदार आदिवासी होते,असे सांगण्यात येते.शिवनेरी किल्ल्याच्या जुन्नर प्रांतात महादेव कोळी या आदिवासी जमातीचे प्रस्थ होते.तसेच
कोंडाणा किल्ला हा नागनाथ या महादेव कोळी
जमातीतल्या सरदारच्या देखरेखीखाली होता. त्याप्रमाणेच
जव्हारचा कारभार देवराम उर्फ जायबा मुकणे यांच्या हाती होता.आजही महादेव कोळींच्या इतिहासात
त्याच्या शौर्याची गाथा गायली जाते.त्या पार्श्वभूमीवर
*जायबा* ही कादंबरी देखील लिहिली गेली.असा शुरवीरांचा गौरवपूर्ण इतिहास आदिवासी जमातींचा आहे,याचा आम्हा मराठी जनमानसाला सार्थ अभिमान आहे.
हळदीघाटाच्या युद्धात महाराणा प्रताप यांच्या सैन्यातील धनुर्धारी भिल्ल सैनिकांनी आपल्या शौर्याने अकबर बादशहाच्या सैनिकांची दानादान उडवून रणभूमीवरून सळो-की-पळो करून सोडलं.त्यामुळे शेवटी अकबर बादशहाला रणभूमीवरून माघार घ्यावी लागली.आदिवासी समाजाचे पुंजा भिल या सरदाराने
हळदीघाटाच्या युद्धात केलेल्या पराक्रमासाठी त्याला राणा प्रताप यांनी *राणा* ची उपाधी बहाल केली.त्यामुळे त्याची मेवाडच्या इतिहासात राणा पुंजा भिल अशी नोंद आहे.इतकेच नव्हे तर,राणा प्रतापांच्या सैन्यदलात सुमारे ४०० आदिवासी सैनिकही होते.याबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून राणा प्रतापांनी आपल्या राजचिन्हावर एकीकडे राजपूत अन्
दुसरीकडे आदिवासीची प्रतिकृती कोरली आहे.सांगण्याचे तात्पर्य म्हणजे आदिवासी लोक हे केवळ लढवैय्येच नव्हे तर,निष्ठावान देखील असतात,याला सर्वच कालखंडात पुष्टी मिळते.
याशिवाय रामायणात *प्रभू रामचंद्र* यांना १४ वर्षांच्या वनवास काळात वनवासींनी मोलाची मदत करून स्वतःला भाग्यवान समजलं.
याच कालखंडातील *शबरीची बोरं* ही कथा आपणा सर्वांना ज्ञात आहेच.महत्वाचे म्हणजे
महाभारताच्या कालखंडात *एकलव्य* च्या धनुर्विद्येचे बळ अतुलनीय होते,याची अनुभूती गुरुवर्य द्रोणाचार्य अन् अन्य योद्ध्यांना
चांगल्याप्रकारे आली होती,याला महाभारताचा इतिहास साक्षीदार आहे.अशा महान योद्धांना आम्ही दंडवत प्रणाम करतो!
आदिवासी समाजाचे दैवत क्रांतीवीर *बिरसा मुंडा* यांनी आपल्या बांधवांच्या हक्कांसाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी झुंज देत वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी शहीद झाला.बिरसा मुंडा यांची *जननायक* म्हणून जनमानसात ओळख होती.जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देऊन बिरसा मुंडा यांनी १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वराज्याची मशाल पेटवली.या पार्श्वभूमीवर क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ राज्य व केंद्र सरकारकडून अनुक्रमे महाराष्ट्र व दिल्लीत पार्लमेंटमध्ये एवं देशात अनेक ठिकाणी भव्यदिव्य स्मारकं उभारण्यात आली. वास्तवात बिरसा मुंडा यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या महान योगदानाची हीच खरी पावती आहे.
सांगण्याचे तात्पर्य म्हणजे वनसंपदेचे रक्षक आदिवासी-वनवासी
बंधू-भगिनी हे अनादी काळापासून सर्वानाच मदतनीस ठरले आहेत,त्यामुळे आपण सर्वजण त्यांचे ऋणाईत आहोत,हे ध्यानी ठेवावे.या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने राजकीय
इच्छाशक्ती ठेऊन आदिवासींचे शिक्षण,रोजगार,आरोग्य,
घरकुल तथा वनजमिनीचा ०मालकी हक्क आदी मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी ०युद्धपातळीवर प्रयत्न करावेत,म्हणजे हीच क्रांतीवीर
बिरसा मुंडा यांना खरी आदरांजली ठरेल.
भारतात आदिवासी लोक हे प्रामुख्याने ०महाराष्ट्र,गुजरात,तेलंगणा,
झारखंड,छत्तीसगड,ओडिसा,
मिझोराम,अंदमान-निकोबार,०ईशान्य भारत,नागालँड,मेघालय,
लक्षद्वीप,मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कमी-अधिक ०संख्येत वास्तव्याला आहेत.महाराष्ट्राचा विचार केल्यास त्यात ०भिल्ल,गोंड,महादेव कोळी,पावरा,ठाकूर,कोकणी,टोकरे कोळी,ढोर ०कोळी,वारली ह्या आदिवासी जमाती असून कोलाम,कातकरी,
माडिया गोंड यांना केंद्र सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केले आहे.राज्यात आदिवासींचे वास्तव्य मुख्यत: नंदुरबार,धुळे,जळगाव,
नाशिक,ठाणे,पालघर,चंद्रपूर,०गडचिरोली,भंडारा,गोंदिया,
नागपूर,अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ०आहे.राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे १० टक्के आदिवासींची ०लोकसंख्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र व राज्य सरकारने ०सर्वसमावेशक योजना राबवून आदिवासींचा सर्वागीण विकास साधावा,जेणेकरून संपूर्ण आदिवासी समाज हा
राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात येऊ शकेल.
आजही राज्यात कोठे कोठे आदिवासी माता व त्यांच्या पाल्यांना *कुपोषणाची समस्या* भेडसावत आहे.यास्तव केंद्र व राज्य सरकारने गर्भवती महिला तसेच त्यांच्या नवजात बालकांसाठी असलेली सकस आहार योजना व अन्य तत्सम योजना प्रभावीपणे राबवाव्यात,जेणेकरून आदिवासी जमातीच्या भावी पिढ्या सर्वदृष्टीने सक्षम होतील. सर्वात महत्वाचे म्हणजे आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम घेवून शैक्षणिक क्षेत्रात अव्वल स्थानावर आघाडी घ्यावी,त्यामुळे पुढील काळात समाजाला सर्वच क्षेत्रात पुढे नेण्यासाठी युवा शक्तीचे योगदान उपयुक्त ठरेल.समस्त आदिवासी
बंधू-भगिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर,आदिवासी समाजाचे दैवत क्रांतीवीर🏹बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन!💐🙏
*✍️लेखक रणवीरसिंह* *राजपूत*
*ठाणे/नंदुरबार*,
*गवर्नमेंट मिडिया
(एक्रिडेशन-मा व ज/ ०४७३),मंत्रालय,महाराष्ट्र शासन* ( मो.न.९९२०६७४२१९)
......................................
Tags
news
