भडणे परिसरात पावसामुळे पीक परिस्थिती नष्ट होण्याच्या मार्गावर,



भडणे परिसरात पावसामुळे पीक परिस्थिती नष्ट होण्याच्या मार्गावर,



शिंदखेडा तालुक्यातील भडणे परिसरात दोन-तीन दिवसापासून सतत धार पावसामुळे कापूस मक्का मुंग उडीद तसेच घरांची पडझड तसेच गावातील एका शेतकऱ्याची वीहीर पावसामुळे खचल्यामुळे तसेच गावातील शेतकऱ्यांचे भाजीपाला पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे 
मागील वर्षी पावसामुळे नदी नाले तसेच तलाव भरले नव्हते अतिशय अल्प प्रमाणात पाऊस पडून शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी उत्पन्न काढले टाकलेला पैसा सुद्धा मागील वर्षी निघाला न होता पुढील वर्षी चांगले येईल या वर्षी यावर या वर्षी पावसाने सुरुवातीपासून दमदार हजेरी लावली त्यामुळे शेतकरी सुखावला होता पाऊस चांगला आहे म्हणून शेतकरी ने कजाने पैसा उपलब्ध करून आपल्या शेतात महागडी खत बियाणे फवारणी निंदनी  करून कापूस मका तसेच आपले पीक उभे करून यावर्षी चांगले उत्पन्न येईल या बरशावर शेतकरी सुकावला होता मात्र या वर्षी सतत धार पावसामुळे पावसाने कापूस मका ज्वारी उडीद  मुग तसेच शेतकऱ्यांची मातीची घर व शेतात जिकडे पाहावे तिकडे पाणी साचल्यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे हाता तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावल्यामुळे शेतकरी या वर्षी आर्थिक संकटात सापडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे सतत धार पावसामुळे भडणे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे कापूस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे गावातील मातीची घरे पावसामुळे कोसळत असून शेतातील दादाभाई वाघ यांची एमआरजीएस योजनेअंतर्गत बांधलेली विहीर जास्त पावसामुळे खचली आहे गावातील धीरज शिंदे नीलकंठ कोळी यांची घरे पाण्यामुळे पडले आहेत याबाबत भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी आपल्या गावातील परिस्थितीची माहिती तलाठी भूपेश कोळी कृषी सहाय्यक निंबा पाटील व प्रशासनाला दिली आहे याबाबत प्रशासनाने त्वरित पंचनामे करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गाकडुन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया...
म्हणणे परिसरात सतत धार पावसामुळे यावर्षी जास्त पाण्यामुळे कापूस मका मुंग उडीद तसेच घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली असून शासनाने त्वरित पंचनामे करून  आर्थिक मदत पुरवावी अशी मागणी माजी सरपंच पांडुरंग माळी यांनी केली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने