निमझरीत मोफत मधुमेह तपासणी व वृक्षारोपण कार्यक्रम ! ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम!



निमझरीत मोफत मधुमेह तपासणी व वृक्षारोपण कार्यक्रम !

ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम!

शिरपूर प्रतिनिधी  - कुरखळी ता. शिरपूर येथील ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान,  व बोराडी कर्मवीर व्यं. ता. रणधीर व लिलाई आयुर्वेदिक हॉस्पिटल  यांच्या संयुक्त विद्यमाने निमझरीत मोफत मधुमेह तपासणी शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आले होते.


       याप्रसंगी गावातील ५० रुग्णांची जेवणाआधी व जेवणानंतर  तपासणी करून  साखरेचे प्रमाण वाढलेले होते, अशा रुग्णांची सरासरी तीन महिने कालावधीत एकूण प्रमाणाची देखील चाचणी मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील सौ भारतीताई पाटील व सौ सिमाताई पाटील यांच्याहस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 


           शिरपूर तालुक्यातील दिवंगत शिक्षक स्व दीपक मोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या बारा वर्षापासून अविरतपणे वृक्षारोपण, शैक्षणिक, सामाजिक, उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार, आरोग्य व रोजगार क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सामाजिक संस्था ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी ही संस्था नवनवीन  उपक्रम राबवित असते. त्यातच एक नवीन उपक्रम घेवून निमझरी गावातील नागरिकांना सदृढ आरोग्य लाभावे म्हणून गावातील रुग्णांची जेवणाआधी व नंतर तसेच तपासणीत साखरेचे प्रमाण वाढलेले होते त्या रुग्णांची सरासरी तीन महिने कालावधीत एकूण प्रमाणाची देखील चाचणी मोफत  करण्यात आली. या शिबिरात एकूण ५० लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी संधिवाताच्या रुग्नाचीही तपासणी करून त्यांना मोफत आयुर्वेदिक औषधांचे वाटप करण्यात आले.
              याप्रसंगी कर्म. व्यं. ता. रणधीर व लिलाई आयुर्वेदिक हॉस्पिटल, बोराडी चे  प्रा. डॉ. नरेंद्र मुंडे, डॉ. गौरव बडगुजर,  उध्दव पाटील, डॉ. शुभम चंदनकर, डॉ. अपर्णा गीते यांच्या सह ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष योगेश्वर मोरे, उपाध्यक्ष डॉ दिलीप पाटील, कार्याध्यक्ष मनोहर वाघ,  छगन गोरख पाटील अध्यक्ष श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट निमझरी व माजी प.स.सदस्य,  मन्साराम भिल पं.स. सदस्य, भिकूबाई भिल सरपंच ग्रां.पं. निमझरी, भरत पाटील उपसरपंच  ग्रां.पं. निमझरी, गोरख  पाटील, गोकुळ गुजर, नारायण गुजर, मधुकर पाटील, श्रीराम पाटील, तसेच पंचायत समिती शिरपुरच्या महिला कर्ममचारी मनीषा मोरे, जोत्स्ना सोनवणे, कविता मोती, सुरेखा सोनवणे,अनिता पाटील,निकिता शिरसाठ, निर्मला शिरसाठ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. विठ्ठल मंदिर ट्रस्ट व संचालक मंडळ व ग्रामस्थ निमझरी व आयुर्वेदिक हॉस्पिटल बोराडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने