बियरच्या मद्यसाठ्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई प्रतिनिधी सुमित गिरासे शहादा




 बियरच्या मद्यसाठ्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

प्रतिनिधी सुमित गिरासे शहादा

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सीमा तपासणी नाका खेडदिगर, ता-शहादा, जि-नंदुरबार पथक यांनी दिनांक 23/08/2024 रोजी राणीपूर- तोरणमाळ रोड, राणीपूर शिवार, ता. शहादा, जि. नंदुरबार येथे गुप्त बातमीच्या आधारे सापळा रचून केलेल्या कारवाईत चार चाकी वाहन परिवहन क्र-MH-23-AD-4116 या वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित व मध्यप्रदेश राज्यात निर्मित, फक्त मध्यप्रदेश राज्यात विक्रीस ग्राह्य असलेली पावर कुल सुपर स्ट्रॉग बियरचे 48 बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये 500 मि. ली. क्षमतेच्या 24 बियर केन व प्रत्येक केन ची छापील किंमत 115 रु. असा एकूण 1152 बियर केन व MAHINDRA MAX (9 Seater) चारचाकी वाहन असा एकूण रु 5,02,480/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई बद्दल निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सीमा तपासणी नाका खेडदिगर, ता-शहादा, जि-नंदुरबार यांच्या कार्यालयात गुन्हा रजिस्टर क्रमांक 45/2024 नोंदविण्यात आलेलाआहे. 

सदरची कारवाई मा. श्री. डॉ. विजयकुमार सूर्यवंशी सो, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्री. पी. पी. सुर्वे सो, संचालक, अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. श्रीमती यु आर वर्मा मॅडम, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक, मा. श्रीमती नेहा सराफ मॅडम, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार व मा. श्रीमती स्वाती काकडे मॅडम, अधीक्षक, राज्यउत्पादन शुल्क, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर कारवाई श्री.बी.व्ही. हिप्परगेकर, निरीक्षक, श्री. डी.बी. कोळपे, दु. निरीक्षक, श्री. एच.पी. घरटे, दुनिरीक्षक सीमा तपासणी नाका खेडदिगर, ता-शहादा, जि-नंदुरबार, श्री. आर. एल. राजपूत, स. दु.नि, जवान सर्वश्री आर.एन. पावरा तसेच म्हसावद पोलीस ठाण्याचे श्री. गणेश वारूळे, स.पो निरीक्षक, श्री. जितेंद्र पाटील, पो. उपनिरीक्षक यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा श्री. डी. बी. कोळपे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन सीमा तपासणी नाका खेडदिगर, ता-शहादा, जि-नंदुरबार हे करत आहेत.

जनतेला आवाहन करण्यात येते कि अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाटसएप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने