मालपुर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम कीर्तन सोहळा
मालपुर प्रतिनिधी .
शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे दर सालावादाप्रमाणे श्री संत सावता महाराजांच्या मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम कीर्तन सोहळा सुरू आहे हे 33 वि वर्ष आहे.
संध्याकाळी पाच ते सहा ज्ञानेश्वरी पारायण.सायंकाळी चार ते पाच प्रवचन, सहा ते सात हरिपाठ, आरती गीता पाठ, रात्री नऊ ते 11 हरिकीर्तन.या हरी कीर्तनात दिग्गज असे कीर्तनकार महाराज उपस्थित राहून कीर्तनाचे लाभ देत आहेत.आजचे कीर्तनकार ह भ प श्री विश्वनाथ महाराज तर वाडेकर, किर्तन सेवेचे यजमान ह भ प वसंत जयराम माळी.व्यासपीठ चालक मोहनदास जी महाराज आळंदीकर साऊंड सर्व्हिस सिस्टिम श्रीराम मंडप, संत सावता भजनी मंडळ परिसरातील सर्व भजनी मंडळांनी साथ दिलेली आहे.अखंड असा हरिनाम सप्ताह नवचैतन्यांनीू सुरू आहे.गावातील सर्व महाजन समाजातील व्यक्तींचे अनमोल सहकार्य आहे.दानशूर व्यक्तीने दान केलेला आहे ही परंपरा 33 वर्षापासून अखंड सुरू आहे आणि सुरू राहील.गावातील परिसरातील भजनी मंडळांनीसाथ ही मोलाची आहे शनिवारी सप्ताहाची सांगता होईल त्यावेळेस काल्याचे किर्तन होईल व माळी समाजातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना . सन्मानित करण्यात येतात .व मोठा महाप्रसादाचा आयोजन केले जाते.
