लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची सूचना तहसीलदार शिरपूर यांचे आवाहन




लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची सूचना 

तहसीलदार शिरपूर यांचे आवाहन


शिरपूर प्रतिनिधी - राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली असून अनेक महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज सादर केलेले आहेत व त्यापैकी काही महिलांचे बँक खाते आपल्या आधार कार्ड नंबरशी संलग्न नाहीत. 
त्यामुळे शिरपुर तालुक्यातील  ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड संलग्न नसतील अशा महिलांनी तात्काळ आपापल्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक खाते नंबर आधार कार्डशी संलग्न करावा, जेणेकरून तालुक्यातील सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ देणे प्रशासनास शक्य होईल असे आवाहन शिरपूर तहसील कार्यालयाकडून तहसीलदार महेंद्र माळी यांच्याकडून  करण्यात येत आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने