मिशन ऑल आउट दरम्यान शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी अवैध हत्यारांची तस्करी आणि गोवंश जनावरांची तस्करी करणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात




मिशन ऑल आउट दरम्यान शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी 

अवैध हत्यारांची तस्करी आणि गोवंश जनावरांची तस्करी करणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात 




शिरपूर प्रतिनिधी - माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांच्या आदेशाने शिरपूर तालुक्यात मिशन ऑल आऊट राबविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने दि. 02/08/2024 सायंकाळीं 07.00 वाजेपासून दिनांक 03/08/2024 चे पहाटे पर्यंत मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे सो. यांचे आदेशान्वये जिल्हाभरात ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले होते. यादरम्यान शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या प्रकारची कामगिरी करीत असताना

1) गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोसई/बाळासाहेब वाघ, पोहेका / संतोष पाटील, पोहेकों / संदिप ठाकरे, पोका/संजय भोई, पोकॉ/योगेश मोरे, पोकों/भुषण पाटील, पोकाँ/ सुनिल पवार यांनी पळासनेर येथे सेंधवा मध्य प्रदेश येथील इसम नामे रवि मोहन सोनी वय 28 वर्षे रा. वार्ड नं.01 देवझीरी कॉलनी सेंधवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश यास गोपनिय बातमी प्रमाणे पळासनेर येथुन ताब्यात घेऊन त्याचेकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुस असे छापा कारवाई करून हस्तगत करण्यात आले असुन शिरपुर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 210/2024 आर्म अॅक्ट कलम 3/25 सह मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

2) दहिवद बीटचे पोहेकॉ/ सागर ठाकुर, पोहेकॉ/ चत्तरसिंग खसावद, पोकॉ/ मुकेश पावरा, पोकॉ/ग्यानसिग पावरा, पोकों/ रोहीदास पावरा यांनी भोईटी गावाजवळ नाकाबंदी व पेट्रोलिंग दरम्यान स्कार्पिओ या संशयित वाहनास तपासणी करून तीन ईसम नामे 1) ईबादत खान अफजल खान वय 33 वर्षे, रा. संजयनगर खरगोन मध्यप्रदेश, 2) आसिफ हुसेन मुबारक हुसेन, वय 25 वर्षे, रा. गुलाबनगर खरगोन मध्यप्रदेश, 3) राकेश रिजंड पावरा, वय 29 वर्षे, रा. हँड्यापाडा ता. शिरपुर जि. धुळे यांना स्कॉर्पिओ या खाजगी प्रवासी वाहनात सहा गोवंश जातीचे बैल-गोन्हे यांची चोरटी वाहतूक करताना पकडले. सदर वाहनांमध्ये दोन तलवारी याप्रमाणे प्राणघातक शस्त्र मिळून आले असुन शिरपुर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 211/2024 प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अधिनिय कलम 11 (1) (ड) (घ) (च) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 चे सुधारीत सन 2015 चे कलम 5 व 9 सह सह मोटार वाहन कायदा कलम 66/(1)/192 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

3) याशिवाय नाकाबंदी दरम्यान पोहेकॉ/ दिनेश सोनवणे, पोहेकॉ/अनिल शिरसाठ, पोहेकॉ/संजय चव्हाण, पोना/मोहन पाटील यांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या एका इसामावर तसेच वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या 08 इसमांवर दंडात्मक कारवाई केली.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक धुळे श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, शिरपुर विभाग शिरपुर श्री. भागवत सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोनि. जयपाल हिरे, पोसई- बाळासाहेब वाघ, पोसई-कृष्णा पाटील, पोहेकॉ /  संतोष पाटील, पोहेकॉ/संदिप ठाकरे, पोकों/ संजय भोई, पोकों/ योगेश मोरे, पोकों/भुषण पाटील, पोकाँ/ सुनिल पवार, पोकों/ कृष्णा पावरा, चापोकों/ चापोफाँ/ सागर कासार मनोज पाटील पोहेकॉ/ सागर ठाकुर, पोहेकॉ/चत्तरसिंग खसावद, पोकों/ मुकेश पावरा, पोकॉ/ ग्यानसिग पावरा, पोकों/ रोहीदास पावरा, पोहेकॉ/ दिनेश सोनवणे, पोहेकॉ/ अनिल शिरसाठ, पोहेकॉ/ संजय चव्हाण, पोना/ मोहन पाटील यांनी केली आहे,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने