श्री संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळ व प्रदेश तेली महासंघ युवक आघाडी यांचे तर्फे तेली समाजातील तालुकास्तरीय विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ
शिरपूर (प्रतिनिधी) श्री संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळ व प्रदेश तेली युवक महासंघ युवक आघाडी यांची संयुक्त बैठक *प्रदेश तेली महासंघ युवक आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी यांचे अध्यक्षतेखाली* संपन्न झाली.
या बैठकीत अनेक वर्षाची परंपरा असलेल्या शिरपूर *तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा गुणगौरव समारंभ* आयोजित करण्यात आला आहे
१० वी, १२ वी परीक्षेत ८० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले, स्कॉलरशिप मध्ये प्राविण्य मिळविलेले, मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, पदवी ,पदविका, विविध व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, PHD ,NET, G Pad, NIIT, G Pad व विविध परीक्षेत प्राविण्य मिळविलेले गुणवंत, यशवंत विद्यार्थी तसेच विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये यशस्वी व्यक्तींचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
तरी सर्व गुणवंत,यशवंत विद्यार्थी, यशस्वी व्यक्ती यांनी आपल्या गुणपत्रिका ची झेरॉक्स प्रत मंडळाकडे त्वरीत जमा करून सहकार्य करावे गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतिमागे पालकांचे संपूर्ण नाव व मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही गौरव करण्यात येणार आहे.
तरी आपली *गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत त्वरित जमा करण्याचे आवाहन श्री संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळ,व प्रदेश तेली महासंघ युवक आघाड चे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी* व पदाधिकारी यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी *तेली समाज पंच मंडळ शिरपूर, खान्देश तेली समाज मंडळ,शिरपूर व श्री विघ्नहर्ता संताजी प्रतिष्टान, शिरपूर शहर व ग्रामीण भागातील तेली समाज बांधवांचे* सहकार्य लाभत आहे.
गुणवंतांनी आपल्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत शामकांत ईशी (रोशनी झेरॉक्स तहसील कार्यालय समोर) ,नरेश बाबूलाल चौधरी, जितेंद्र महादू सोनवणे (जिनियस अब्याकस सेन्टर),रमेश सुकलाल चौधरी सर, भरत संतोष चौधरी,सुनिल नारायण चौधरी, राकेश नवनीत चौधरी (जिल्हाध्यक्ष म न से), दिनेश अशोक चौधरी, राकेश सुरेश चौधरी,गणेश दिलीप चौधरी, चंद्रावधन बाबुराव चौधरी, जयेश सुभाष चौधरी, मोहन रामकृष्ण चौधरी, राजेंद्र दिलीप चौधरी, दिनेश शिवलाल चौधरी,प्रकाश सुनील चौधरी, दीपक छगन चौधरी, शिरीष मोतीलाल चौधरी, कैलास दगडू चौधरी, भरत पंडीत चौधरी ,किरण रामनाथ चौधरी, यांचेसह ग्रामीण भागात रविंद्र सोमा चौधरी (उंटावद), अशोक सुकलाल चौधरी (उंटावद),धोंडू नाटू चौधरी (दहिवद) ,भुपेश रमेश चौधरी (थाळनेर),दगडू नारायण चौधरी (भाटपुरा),काशिनाथ धनजी चौधरी व किशोर देविदास चौधरी (वाघाडी),गजानन अनिल चौधरी (कळमसरे),लालचंद दामू चौधरी (शिंगावे), शांताराम आत्माराम चौधरी (होळनांथे), चंद्रकांत शरद चौधरी व दयाराम दौलत चौधरी (खरदे), दिलीप जयराम चौधरी (कुवे, गोपाल सुभाष चौधरी (टेकवाडे), विजय दिलीप चौधरी (अजंदे खु) यांचे कडे दि १५ ऑगस्ट २०२४ पावेतो जमा करून सहकार्य करण्याचे आवाहन श्री संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळ व प्रदेश तेली महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
