अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदी कॉ. राजन क्षीरसागर
नवी दिल्ली येथे अखिल भारतीय किसान सभेच्या (एआयकेएस) झालेल्या बैठकीत कॉ. राजन क्षीरसागर यांची अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. देशपातळीवरील श्रमिकांच्या या संघटनेचे अध्यक्षपद कॉ. क्षिरसागर यांच्या रूपाने महाराष्ट्रातील एका संघर्षशील नेत्यास मिळाले आहे. यापुर्वी महाराष्ट्रातून क्रांतीसिंह नाना पाटील यांनी या संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती.
नवी दिल्ली येथे दि. 15, 16 जुलैला अखिल भारतीय किसान सभेची बैठक पार पडली होती. या बैठकीत राजन क्षिरसागर हे अध्यक्ष तर राऊला व्यंकटेश हे जनरल सेक्रटरी म्हणून निवडले गेले. या बैठकीत ‘क्रांतीसिंह नाना पाटील, जीवन व कार्य’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्षपद यापुर्वी देशपातळीवरील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी भूषविले आहेत. स्वामी सहजानंद सरस्वती, एन.जी. रंगा, इंदुलाल याज्ञीक, राहुल सांकृत्यायन, बाबा सोहनसिंग भकना, क्रांतीसिंह नाना पाटील, ए.के. गोपालण, प्रबोध पांडा आदी अनेक नेते यापुर्वी अखिल भारतीय किसानसभेच्या अध्यक्षपदावर राहिलेले आहेत.
देशातील नैसर्गीक संसाधने बड्या भांडवलदाराच्या घशात घालण्याचा उद्योग केंद्र सरकारने चालवला असून या विरोधात अखिल भारतीय किसान सभेने सातत्याने आवाज उठवला आहे. देशातल्या अन्य श्रमिक व शेतकर्यांच्या चळवळींना सोबत घेवून संयुक्त किसान मोर्चा मजबूत करण्यासाठी येत्या क्रांतीदिनी देशपातळीवर ‘डब्ल्युटीओ चले जावो आंदोलन’ करण्यात येईल. तसेच दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील केंद्राच्या जाचक अटी दूर करण्यात याव्यात. यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल. दुष्काळ आणि नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत असतानाही त्यांना सरकारी धोरणांमुळे न्याय मिळत नाही. यासाठी सातत्याने संघर्ष केला जाईल अशी प्रतिक्रिया कॉ. राजन क्षिरसागर यांनी दिली.
अखिल भारतीय किसान सभा हि देशपातळीवरील शेतकऱ्यांची संघटना 1936पासुन शेतकऱ्यांचा प्रश्नावर लढा देत आहे.क्रांतिसिंह नानापाटील यानी महाराष्ट्र तुन या संघटनेचे नेतृत्व करून बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवुन खासदार निवडणुन देखील आले होते.
शेतकऱ्यांचे कर्ज फिटल म्हणा या साठी देखील लढा दिला होता.
दिनांक 16/07/2024रोजी क्रांतिसिंह नानापाटील याचे इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन काॅम्रेड भालचंद्र जी कानगो.यानी केले.
काॅम्रेड राजन क्षीरसागर यांचा शेतकर्याचे पिक विमा,जल सिंचन,ऊस,सोयाबीन,कापूस ईत्यादी विषायाचा दांडगा अभ्यास आहे.म्हणून अध्यक्ष पदी त्यांची निवड योग्यच झाली आहे.
काॅम्रेड राजन क्षीरसागर यांची अखिल भारतीय किसान सभेचा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल
महाराष्ट्र राज्य किसान सभा,महाराष्ट्र
भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र
तर्फै हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
अँड.हिरालाल परदेशी
प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा,महाराष्ट्र
कार्यकारिणी सदस्य
भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र.

