टाकरखेडा येथील सर्पमित्रांनी नऊ फुट लांबीचा अजगरस दिले जीवनदान*




*टाकरखेडा येथील सर्पमित्रांनी नऊ फुट लांबीचा अजगरस दिले जीवनदान*

आज दिनांक आठ जुलै रोजी मोजे टाकरखेडा गावात भला मोठा सर्प दिसून आला. 
 टाकरखेडा गावातील अक्कूसिंग नरेंद्रसिंग राठोड यांच्या सालदार श्री अनिल  सोनवणे यांस भला मोठा सर्प दिसून आला. अनिल यांनी तात्काळ शेतमालक यांच्याशी संपर्क साधला संपर्क साधा त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती दिली मालकास अक्कूसिंग नरेंद्रसिंग राठोड यांनी गावातील प्रसिद्ध  शेकनाथ महिदे व सर्पमित्र गंगाधर कोळी त्यांना सर्प विषयी माहिती दिली सदर सर्पमित्र हे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतात भला मोठा नऊ फुटाचा अजगर हा चाऱ्याचा ढगाल्याखाली जाऊन बसलेला होता सदर  सर्पमित्र शेकनाथ महिदे व गंगाधर कोळी यांनी जिवरक्षा वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वाघाडी येथील अध्यक्ष सर्पमित्र दिनेश बोरसे यांना तात्काळ संपूर्ण घटनेची माहिती दिली दिनेश बोरसे यांनी दोडायचा येथील प्रादेशिक वन विभागाचे कर्मचारी  वनरक्षक नूर पठाण यांच्याशी संपर्क साधून टाकरखेडा गावात अजगर असल्याची संपूर्ण माहिती दिली नूर पठाण यांनी तात्काळ टाकरखेडा येथे जाऊन सर्पमित्र शेकनाथ महिदे व गंगाधर कोळी यांचा समक्ष ठिकाणी पोहचून अजगरस पकडून त्याला एका खताची गोणी मध्ये पकडून त्याला जेल बंद केले व सदर अजगरस वनविभागाच जंगलात थंड जागेत सोडण्यात आला. अजगर सोडताना त्याठिकाणी पंचनाम करून अजगरस सोडून दिले. 
 अजगर सोडल्यानंतर प्रादेशिक वनविभागाचे कर्मचारी नूर पठार यांनी सर्पमित्र यांचे आभार व्यक्त केले.  सदर अजगरास जीवदान देऊन सर्पमित्रांनी खूप महान कार्य केले आहे असे सांगितले.. यावेळी शेतमालक आकूसिंग राठोड, सर्पमित्र शेकनाथ महिदे व सर्पमित्र गंगाधर कोळी सर्प मैत्रीण  उमीला महिदे उपस्थित होते..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने