कर्मवीर मित्र मंडळातर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना व मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन




कर्मवीर मित्र मंडळातर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना व मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

शिरपूर -  दिनांक 9/7/ 2024 पासून् माझी शालेय शिक्षण मंत्री  भाईसाहेब अमरीशभाई पटेल व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल  यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व भव्य मतदार नोंदणी शिबिरास प्रारंभ झाला. सदर शिबिर हे वासुदेव वासुदेव बाबा मंदिराजवळ आयोजित केले असून दिनांक 9/7/2024 ते 11/7/2024, पर्यंत सकाळी 9.00 ते 4.00 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. सदर शिबिरास भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाऊसो बबनरावजी चौधरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष  भाऊसो तुषार विश्वासराव रंधे यांनी सदिच्छा भेट दिली. सदर शिबिरास परिसरातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून सदर शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आव्हान नगरसेवक बाबासो रोहित रंधे, नगरसेविका ताईसो सुलोचनाताईाळुंखे यांनी केले आहे. सदर शिबिरास मयूर चौधरी, अनिकेत बोरसे, रोहित चौधरी, दीपक चौधरी, काजल पावरा, प्रतीक्षा पाटील, रितिका गिरासे, रोहित जाधव यांचे नोंदणीसाठी सहकार्य लाभले. तसेच परिसरातील दीपक जमादार, राज सिसोदिया, रोहित नासदे, सागर साळुंखे, रंजीत एडवे, रामा भावसार, गिरीश चौधरी, लक्ष्मण लोहार या तरुण कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.तसेच वासुदेव बाबा मंदिराचे अध्यक्ष सुरेशरावजी चौधरी व सदस्यांचे अनमोल सहकार्य प्राप्त झाले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने