धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे शिरपुर तालुक्यातील सांगवी परिसरातील नागरिकांसाठी मानव व पशु आरोग्य तपासणी शिबीराचे मोफत आयोजन




धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे शिरपुर तालुक्यातील सांगवी परिसरातील नागरिकांसाठी मानव व पशु आरोग्य तपासणी शिबीराचे मोफत आयोजन

शिरपूर - धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे शिरपुर तालुका पोलीस ठाणे व आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 05 जुलै 2024 रोजी शिरपुर तालुक्यातील सांगवी परिसरातील नागरिकांसाठी मानव व पशु आरोग्य तपासणी शिबीराचे मोफत आयोजन करण्यात आले.

माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे यांनी शिरपुर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत दुर्गम भागातील नागरिकांसाठी व त्यांच्या पशुंसाठी साथीचे रोग व विविध आजारासंबंधी शिबीर घेऊन पोलीस जनता संबंध वृद्धिंगत करण्यावावत निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने शिरपुर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  जयपाल हिरे व त्यांच्या अधिनिस्त अधिकारी अंमलदार यांनी शिरपुर येथील व धुळे येथील आरोग्य आधिकारी बांचेशी संपर्क साधून धुळे जिल्हा पोलीस दल व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सांगवी गावातील आश्रम शाळेत विविध आजारांसंबधी आरोग्य शिविर घेतले. त्यात सांगयी गाव व पंचक्रोशीतील २६० ग्रामस्थांची तपासणी करुन घेतली त्यापैकी १३८ नागरिकांना चष्मांची वाटप करण्यात आली तसेच २८ रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय, शिरपुर येथे मोतीबिंदू ची मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. या उपक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक श्री.डॉ. सुनील पावरा हे स्वतः त्यांच्या टीमसह हजर होते. PHC सांगवीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बन्सीलाल पावरा हे सुद्धा हजर होते. तसेच सांगवी गावातील पशुचिकित्सक शिबिरात २३० पशुंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून १८० पशुंना लस देण्यात आली आहे. इतर पशुंना गोचीड प्रतिबंधक इंजेक्शन, गर्व धारणा तपासणी व वंधत्व निवारण सारखे उपचार करण्यात आले. त्यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विजय वाविस्कर, परिचर दौलत पावरा व नुकतेच धुळे जिल्ह्यात नियुक्त झालेले सात नवनियुक्त पशुधन विकास अधिकारी असे उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान महामार्ग क्रमांक ५२ वर होणा-या अपघातातील जखमींना तत्काळ मदत करुन त्यांचे प्राण वाचवणाऱ्या २० तरुणांना "जीवन रक्षक" असे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय आश्रम शाळेतील गरजू पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी ११० कलर बॉक्स व नोटबुक व आठवी ते दहावीच्या मुलांसाठी १०० स्कूल चेंगचे वाटप पोलीस विभागाकडून करण्यात आले.

सदर कार्यक्रम हा आश्रम शाळा व पशुवैद्यकीय दवाखाना सांगवी असा दोन ठिकाणी घेण्यात आला. तेथील ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत सोनवणे, डॉक्टर सुनील पावरा यांनी मार्गदर्शन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने