*बारी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ शासनाने मंजुरी दिल्या बद्दल सकल बारी समाजाच्या वतीने शासनाचे आभार - संजय आसापुरे*
शिरपुर : बारी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्या बद्दल सकल बारी समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार व माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे आभार व्यक्त करतो असे शिरपुर सुर्यवंशी बारी समाज तालुकाध्यक्ष संजय रघुनाथ आसापुरे (बारी) यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रातील बारी समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मागण्या अनेक दिवसापासून राज्य शासनाकडे प्रलंबित होत्या त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बारी समाज महासंघाने माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राज्यस्तरीय बारी समाज मेळावा घेऊन सदर मागण्या राज्य सरकार कडून मंजूर करून घेण्यासाठी आपण पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी दानवेंकडे केली होती. दानवेंनी बारी समाजाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि ना. अजित पवार यांच्याकडे समर्थपणे मांडल्या. दानवेंच्या पाठपुराव्याला तातडीने प्रतिसाद देत राज्य शासनाने बारी समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारी समाजाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्तर उंचावण्यास नक्कीच हातभार लागेल यात शंका नाही. असे हि शिरपुर सुर्यवंशी बारी समाज तालुकाध्यक्ष संजय रघुनाथ आसापुरे (बारी) यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रात म्हटले आहे. संजय आसापुरे यांच्यासह सकल बारी समाज बांधवांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार व माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे आभार व्यक्त केले आहे.
