पेसाची तात्पुरती भरती स्थानिकांमधूनच करा
प्रतिनिधी, शिरपूर
राज्य शासनाच्या पेसाच्या भरतीबाबत पेसा क्षेत्रात नियमित भरती होईपर्यंत निवृत्त शिक्षकांना नियुक्त करण्याचा निर्णया विरोधात युवक कांग्रेसच्या वतीने निवेदन देवून निवृत्त शिक्षकांऐवजी स्थानिक आदिवासी उमेदवारांमधून भरती करण्याची मागणी गट विकास अधिकारी शिरपूर यांच्या मार्फत सीईओ धुळे यांना पाठवलेल्या निवेदनातून केली.
निवेदनात 15 जुलै 2024 रोजीच्या शासन परिपत्रकाचा संदर्भ देत, राज्य शासनाच्या पेसा क्षेत्रात नियमित भरती होईपर्यंत निवृत्त शिक्षकांना नियुक्त करण्याच्या निर्णयाला विरोध करत जिल्ह्याच्या प्रत्येक आदिवासी गाव / पाड्यावर स्थानिक आदिवासी डि. एड. /बी.एड. /एम.एड. पात्रता धारक उमेदवार उपलब्ध असून त्यांनाच नियुक्ती देण्याची मागणी गट विकास अधिकारी शिरपूर यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी मनोज पावरा, युवक कांग्रेसचे तालुकाध्यक्ष गेंद्या पावरा, अरविंद पावरा, विजय पावरा, संजय पावरा आदि उपस्थित होते.
