थाळनेरला ऑनलाईन सर्व्हर डाऊन मुळे रेशन वाटप बंद पावसामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ




थाळनेरला ऑनलाईन सर्व्हर डाऊन मुळे रेशन वाटप बंद 
पावसामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ 
थाळनेर (प्रतिनिधी)
       शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावातील रेशन दुकानदारांकडे ई-पॉस मशीनचा ऑनलाईन सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रेशन वाटप बंद आहे. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने रेशन वाटपाची मुदत वाढवून देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
     याबाबत थोडक्यात वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावात ४ रेशन दुकानदार आहेत. जुलै महिन्याच्या रेशन वाटप  दुकानदारां कडील ई-पॉस मशीनचा ऑनलाइन सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रेशन वाटप ठप्प झाले आहे. जुलै  महिन्याच्या सुरुवातीपासूनच एकसारखा पाऊस सुरू असल्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे व मजुरांकडे आर्थिक चणचण आहे. रेशन बंद मुळे शेतकरी व शेतमजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जुलै महिना संपत आला तरीही नागरिक रेशन पासून वंचित आहे. तसेच जून महिन्यात ई- के वाय सी च्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरत महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रेशन वाटप करण्यात आले होते. काही दुकानदार नागरिकांना पक्की पावती देत नाही. त्यामुळे नागरिकांकडून काळा बाजाराची शंका व्यक्त होत आहे.शासकीय सुटी वगळता नागरिक महिन्यात केव्हाही रेशन घेऊ शकता. परंतु थाळनेर गावात काही रेशन दुकानदारांकडून नागरिकांना वेठीस धरले जाते. याकडे शासनाचे व लोकप्रतिनिधींचे ही दुर्लक्ष आहे. याबाबत चौकशी करून कारवाईची मागणी नागरिकातून होत आहे.
    शासनाने मुदत वाढवून राहिलेल्या नागरिकांचा रेशन पुढील महिन्यात वाटप करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने