भोरटेक ग्रामपंचायतच्या गैरव्यवहार चव्हाट्यावर सरपंच पती व ग्राम रोजगार सेवक यांच्यावर महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत शासनाचे अनुदानाचा दुरुपयोग करण्याच्या आरोप थाळनेर प्रतिनिधी - रवी तवर




भोरटेक ग्रामपंचायतच्या गैरव्यवहार चव्हाट्यावर
 
सरपंच पती व ग्राम रोजगार सेवक यांच्यावर महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत शासनाचे अनुदानाचा दुरुपयोग करण्याच्या आरोप 

थाळनेर प्रतिनिधी - रवी तवर 

शिरपूर तालुक्यातील भोरटेक ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी रोजगार योजना म्हणजे एमआरजीएस अंतर्गत झालेल्या गोठा बांधकामात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याच्या आरोप गावातील कार्यकर्ते स्वप्नील सुधाकर जाधव, रमेश शामराव शिरसाट, प्रदीप राजाराम जाधव, योगराज रामदास पाटील यांनी लेखी तक्रारीतून केला होता. आणि या संदर्भात सविस्तर चौकशीची मागणी केली होती. 

सदर गैरव्यवहाराची रितसर चौकशी व्हावी यासाठी त्यांनी पंचायत समिती शिरपूर येथे आंदोलन देखील केले होते. 

अखेर पंचायत समिती शिरपूर मार्फत एक समितीची स्थापना करण्यात आली आणि तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली.

सदरच्या मूळ तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी ग्रामपंचायत अंतर्गत एमआरजीएस योजनेअंतर्गत मार्च 2019 ते मार्च 2024 या कालावधीत गावात झालेल्या गोठा बांधकाम कामांचे गुणवत्ता तपासून तसेच मस्टर वर्क ऑर्डर कामाची छायाचित्रे ,जॉब कार्ड , व रस्ता कामांची तपासणी करण्याची मागणी केली होती. या कामात आर्थिक घोटाळा आणि अनियमितता झाल्याच्या त्यांनी आरोप केला होता.

सदर समितीने या तक्रारी अंतर्गत गावात झालेल्या 11 गोठा बांधकामाची चौकशी केली. यात 8 प्रस्ताव पंचायत समिती शिरपूर येथे सादर करण्यात आले आहेत मात्र इतरत्र तीन प्रस्ताव पंचायत समिती शिरपूर येथे सादर न करता बांधकाम करण्यात आले आहे असे नमूद केले आहे. शिवाय जे आठ प्रस्ताव सादर आहेत त्यांचे बांधकाम सातबारा उतारा वर दर्शवल्याप्रमाणे केलेले नसून ते रहिवास असलेल्या घराजवळ बांधकाम केल्याचे दिसून आले आहे. 

ग्रामपंचायत ने लाभार्थ्यांची निवड ही ग्रामसभेत प्रस्ताव तयार करणे आवश्यक होते परंतु पंचायतीने ग्रामसभेत निवडणूक करता मासिक सभेत निवड करून प्रस्ताव सादर केले आहेत.

तीन गोठ्यांना मंजुरी नव्हती तरीदेखील प्रस्ताव सादर न करता त्यांचे बांधकाम करण्यात आले असून अनुदान घेण्यात आले आहे. 

याशिवाय या गावातील ग्राम रोजगार सेवक जयवंत पाटील यांनी स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने गोठे बांधकाम मंजूर करून घेतले मात्र बांधकाम न करता इतर गोट्यांचे बांधकामाचे फोटो कर्मचाऱ्यांशी संगणक साधून वेबसाईटवर अपलोड करून अनुदानाच्या लाभ घेतला असल्याची बाब देखील समोर आले आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील अधिक लोकांना लाभ दिल्याची बाब स्पष्ट झाली आहे. 

तसेच सरपंच पदी सुरेश पाटील यांनी व लुका पाटील या दोन लाभार्थ्यांनी एकत्रित पत्रा शेळचे बांधकाम केले आहे. व अनुदान लाटले आहे असे चौकशीत दिसून आले आहे. 

त्यामुळे या चौकशीतून असे समोर आले आहे की गोठा बांधकाम करताना प्रस्ताव सादर न करणे, किंवा ज्यांचे प्रस्ताव सादर आहेत त्यांचे प्रस्ताव नियोजित जागेवर बांधकाम न करता इतरत्र बांधकाम करणे, रस्ता नस्ताना मंजुरी देणे एकाच कुटुंबातील पती-पत्नी यांना लाभ देणे, गुरांच्या गोठ्याचे बांधकाम न करता दुसऱ्या व्यक्तीच्या फोटो वेबसाईटवर अपलोड करून शासनाच्या अनुदानाच्या लाभ घेणे, एकाच जागेवर दोन गोठे दाखवणे,व शासकीय निधीच्या दुरुपयोग करणे इत्यादी अनियमित्ता केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील बोगस लाभार्थ्यांकडून रक्कम महसूल करण्यात यावी असा देखील अभिप्राय देण्यात आला आहे. 

सदर चौकशीतून प्रामुख्याने सरपंच पती सुरेश पाटील, ग्रामरोजगार सेवक जयवंत पाटील, यांच्यासह तांत्रिक सहाय्यक यांच्यावर अनियमित्ता केल्याच्या ठपका ठेवण्यात आला आहे.

सदरच्या अहवाल प्रशासनाने पुढील कारवाईसाठी वरिष्ठांना सादर केला आहे आता या प्रकरणात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आता या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार यांच्याकडून करण्यात आली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने