रोटरी स्कूलमध्ये लोकमान्य टिळकांना अभिवादन* दोंडाईचा (अख्तर शाह)




*रोटरी स्कूलमध्ये लोकमान्य टिळकांना  अभिवादन*
दोंडाईचा (अख्तर शाह)

दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय असंतोषाचे जनक,आधुनिक भारताचे निर्माते,साहित्यिक, तत्ववेत्ते असणारे लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य श्री  श्रुतिरंजन बारिक यांनी  लोकमान्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
      कु. हिना पाटील व कु अंकिता पाटील यांनी सिंहासारखे धाडस व क्रांतिकारी चळवळीचे अग्रणी असणाऱ्या लोकमान्य टिळकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांच्या अन्याय-अत्याचाराला न जुमानता   त्याविरुद्ध लढले. ब्रिटिशांविरोधातील आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावली. अशा शब्दांत लोकमान्यांचे कार्य आपल्या भाषणातून मांडले.
       श्री डी. एम. पाटील व सौ. ललिता गिरासे यांनी आपल्या भाषणातून लोकमान्य टिळकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकून लोकमान्य हे कणखर व्यक्तिमत्व, स्थितप्रज्ञ स्वभावाचे व देशभक्तीने प्रेरित होऊन कार्य करण्याची निष्ठा  असणारे महामेरू असल्याचे सांगितले.
तर प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक म्हणाले की, लोकमान्य टिळक धाडसी व आदर्शवादी व्यक्तिमत्व होते.भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान असणाऱ्या लोकमान्य टिळकांचे विचार देशाचे  स्वातंत्र्य अबाधीत ठेवण्यासाठी प्रेरणादायी आहेत.
सूत्रसंचालन ललिता गिरासे यांनी केले .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने