दहिवद शिव मंदिरावर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण शिरपूर तालुक्यात कृषी विक्रेता संघटनेमार्फत ११००० वृक्ष लागवड करण्याचा संकल्प थाळनेर (प्रतिनिधी) रवी तवर




दहिवद शिव मंदिरावर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण 
 शिरपूर तालुक्यात कृषी विक्रेता संघटनेमार्फत
११००० वृक्ष लागवड करण्याचा संकल्प 

थाळनेर (प्रतिनिधी) रवी तवर 

 शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटना व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यात विविध ठिकाणी ११००० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. 
      या वृक्ष लागवडीचा शुभारंभ धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते तालुक्यातील दहिवद गावाजवळील शिरपूर साखर कारखाना समोरील शिवमंदिरच्या परिसरातील पडीत जागेवर करून करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक डी.सी.एफ. गजेंद्र हिरे, धुळे रोहयो उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, शिरपूर उपविभागीय अधिकारीडॉ. शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, धुळे जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी प्रदीप निकम, शिरपूर पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी राजेश चौधरी आदी उपस्थित होते. शिव मंदिर परिसरातील पडीत जागेवर ५१ विविध प्रकारच्या वृक्षांचे लागवड करण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी CRA तंत्रज्ञान पद्धतीने वृक्ष लागवड कशी करावी याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले. शिरपूर तालुका कृषी विक्रेत्या संघटनेमार्फत तालुक्यातील २२० विक्रेत्यांमार्फत गावातील पडीक जमिनीवर ११००० विविध प्रकारांच्या वृक्षांची लागवड करून संगोपन करण्यात येणार आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष हेमंत चौधरी यांनी दिली. 
          या कार्यक्रमास माफदाचे राजेंद्र भंडारी, राजेश पगारे,नामदेव धनगर, निलेश अग्रवाल, लक्ष्मण पाटील,आशिष अग्रवाल, नागराज पाटील, उज्वल निकम,जगदीश पाटील, प्रमोद पाटील, मोहित अग्रवाल,महेंद्र पाटील, जयपाल राजपूत, जितेंद्र राजपूत,महेश बंजारा,शिवाजी गोपाल समाधान पाटील,भूपेंद्र पाटील,प्रमोद चिंचोरे सुनील पावरा,दिनेश पाटील,मनोज चौधरी पांडुरंग गोपाल, समाधान गोपाल मंडळ कृषी अधिकारी विशाल मोटे, कैलास गोपाळआदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे पदाधिकारी व कृषी विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने