रोटरी स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन* दोडाईचा (मुस्तूफा शाह)




*रोटरी स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन*
दोडाईचा (मुस्तूफा  शाह)


दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा व भजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक व समन्वयक श्री प्रशांत जाधव यांनी सर्व भेदभाव बाजूला ठेवून प्रवाहित झालेल्या वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेची मनोभावे पूजा करून अभिवादन केले. वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाची महती भजनाच्या माध्यमातून सांगण्यात आली.
     या आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान करून रोटरी स्कूल,स्वामी नारायण मंदिर, विद्यानगर,मोहनशेठनगर, पार्श्वनाथनगर गबाजीनगर मार्गे विठ्ठलमंदिरपर्यंत काढण्यात आलेल्या या  दिंडीत सहभाग घेतला. पायी चालत बाल भजनी मंडळ यांनी टाळ-मृदुंगाच्या साथीने सादर केलेल्या 'भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी' विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला 'भेटीलागी जीवा' या अभंगांनी रोटरी स्कूल व गबाजीनगर येथील विठ्ठल मंदिर परिसर हरिनामाच्या ( विठ्ठलाच्या) जयघोषाने दुमदुमून गेला. 
       कृष्णा ओतारी याने विठ्ठलाची, तर कु.शौर्या शिंदे हिने  रुक्मिणीची भूमिका साकारली.
        विठ्ठल मंदिरावर घेण्यात आलेल्या अध्यात्मिक कार्यक्रमातून भक्त पुंडलिकाची विठ्ठलावरील अपार श्रद्धा, वारकरी संप्रदायाची समानतेची शिकवण, या संप्रदायातील संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांसारख्या अनेक संतांनी आणलेली अध्यात्मिक लोकशाही,त्यांनी केलेले समाजप्रबोधनाचे कार्य परिसरातील नागरिकांना पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुवर्णा पाटील, ललिता वाघ, विक्की बाटुंगे, राकेश ईशी यांचे सहकार्य लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने