धुळे वनविभागातील लेखापाल तीन हजार रुपयांची लाच घेताना अटक धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई




धुळे वनविभागातील लेखापाल तीन हजार रुपयांची लाच घेताना अटक 

धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई 

धुळे प्रतिनिधी -  धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उपाधीक्षक म्हणून नव्याने पदभार स्वीकारलेले सचिन साळुंखे यांनी आपल्या कामास सुरुवात केली असून पहिल्याच आठवड्यात ही कारवाई केली आहे. 

या कारवाईत एसीबीने आरोपी किरण गरीबदास अहिरे, लेखापाल, उप वनसंरक्षक कार्यालय, धुळे वन विभाग, धुळे यांनी तक्रारदार यांचेकडुन ३,०००/-रु लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

तकारदार हे बहाळ (रथाचे), ता. चाळीसगांव, जि. जळगांव येथील रहिवाशी असुन त्यांचा लाकुड वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांनी मौजे गरताड ता. व जि. धुळे येथील शेतकरी यांच्या शेतात लागवड केलेल्या तोडलेल्या सागाच्या १०० झाडांच्या लाकडाच्या ९७ नगाची वाहतुक करण्याचे काम घेतले होते. त्याकरीता सदर गरताड येथील शेतक-याने झाडे तोडुन लाकुड वाहतुकीची परवानगी मिळणेकरीता दि. २१.०२.२०२४ व २३.०२.२०२४ रोजी वन क्षेत्रपाल, धुळे (ग्रामीण) यांचेकडे अर्ज केलेला होता.

सदरची परवानगी मिळणेकरीता तकारदार हे उप वनसंरक्षक कार्यालय, धुळे येथे जावुन पाठपुरावा करीत होते. तेव्हा सदर कार्यालयातील लेखापाल किरण अहिरे यांनी लाकुड वाहतुकीच्या परवानगीचे काम करुन देणेसाठी तकारदार यांचेकडे ३,०००/- रु. लाचेची मागणी केल्याची दि.१० ०७.२०२४ रोजी तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयाकडे दिली होती.

सदर तक्रारीची आज दि.११.०७.२०२४ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान लेखापाल किरण अहिरे यांनी तक्रारदार यांचेकडे ३,०००/- रु लाचेची मागणी करुन ३,०००/- रुपये स्विकारण्याचे मान्य केल्याने आज रोजी त्यांचेवर सापळा लावला असता सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द धुळे शहर पो. स्टे. जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली सांडवी, तसेच पथकातील राजन कदम, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रविण पाटील, प्रशांत बागुल व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी व वाचक पोलीस निरीक्षक श्री. स्वप्निल राजपुत यांचे मार्गदर्शन लाभले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने