टोकरे कोळी युवा मंच आयोजित गुणवंत विद्यार्थी, खेळाडू तसेच विविध क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.




टोकरे कोळी युवा मंच आयोजित गुणवंत विद्यार्थी, खेळाडू तसेच विविध क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.

शहादा प्रतिनिधी सुमित गिरासे

         टोकरे कोळी युवा मंचच्या वतीने रविवार, दि.२८ जुलै, २०२४ रोजी शहादा येथे गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, पत्रकार, शासकीय सेवेत नव्याने रुजू झालेले कर्मचारी इत्यादींच्या सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय डॉ.राजेश कोळी (भगवती हॉस्पिटल, नंदुरबार) तसेच प्रमुख पाहुणे श्री.पितांबर देवरे गुरुजी (सेनि. मुख्याध्यापक), प्रा.स्वप्नील आंबेकर (डिन ऍडमिन) व प्रा.प्रसाद कुलकर्णी (ट्रैनिंग आणि प्लेसमेंट विभाग प्रमुख, संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजनिअरिंग अँड मॅनेजमेंट संदीप फाउंडेशन नाशिक), ऍड.मोहनिश थोरात, डॉ.श्री.योगेश सावळे (गटशिक्षणाधिकारी, शहादा), श्री.दशरथ आनंद निकुम (नगराध्यक्ष, खेतिया), श्री.पावबा बागुल (संस्थापक मित्तल ग्रुप), श्री.पुंडलिक सपकाळे (सेनि. उपअधीक्षक), श्री.राज अंतुर्लीकर (AESPL, व्यवस्थापकीय संचालक), श्री.राजेश खर्डे वेसावकर, ऍड.जे. पी. कुवर, श्री.नारायण बागुल (समाजसेवक), श्री.कमलाकर दादा, श्रीमती मंगलाताई सोनवणे, श्रीमती कविताताई कोळी, श्री.गोपीचंद बोरसे (ज्येष्ठ पत्रकार), श्री.कृष्णा शिरसाठ (युवा उद्योजक), श्री.जगदीश बागुल (मित्तल ग्रुप, आफ्रिका), श्री.मनोहर वाघ (जेष्ठ मार्गदर्शक), श्री.अरुण भानुदास कोळी (वैद्यकीय अधिकारी) हे उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, पुष्प व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

         टोकरे कोळी जमातीतील प्रथम सनदी लेखाधिकारी (सीए) चि.चिराग बागुल (खर्दे, शिरपूर) तसेच इयत्ता दहावी, बारावी, कला, वाणिज्य व विज्ञान (प्रथम/व्दितीय/तृतीय वर्ष) शाखेतील व इतर अभ्यासक्रमात उत्तम गुणांनी उत्तीर्ण सुमारे २८० विद्यार्थी तसेच २० सामाजिक कार्यकर्ते, २२ खेळाडू, पत्रकार, शासकीय कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. श्री.गोपीचंद बोरसे (ज्येष्ठ पत्रकार) यांना "प्रेरणा पुरस्कार" सन्मानचिन्ह व रू.५०५१/- रोख देवून गौरविण्यात आले.  इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ९३% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या ५ विद्यार्थ्यांना डॉ.राजेश कोळी (कान, नाक, घसा तज्ञ, भगवती हॉस्पिटल) यांनी रु.१,१००/- रोख देवून विशेष सत्कार केला. तसेच दिव्यांग गोकुळ धोंडू सावळे (वाठोडे) यांना तीनचाकी सायकल आणि अंध गणेश ईशी (चांदगड) यांना कॅसिओ भेट देण्यात आले.

         ऍड.मोहनिश थोरात यांनी कायदेविषयक,  प्रा.स्वप्नील आंबेकर, डॉ.राजेश कोळी आणि डॉ.योगेश सावळे यांनी शिक्षणविषयक, श्री.पावबा बागुल यांनी सांगितले की, समाजाने हाक द्यावी मित्तल ग्रुप नेहमी समाजासाठी तत्पर असणार तसेच श्री.मनोहर वाघ यांनी सामाजिक समस्यांविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना विशेष असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक संकटावर मात करत आपले ध्येय गाठले पाहिजे. त्यासाठी जिद्द, चिकाटीने स्पर्धा परीक्षा, उद्योग या क्षेत्राकडे वळले पाहिजे. सोशल मीडियाचा अति वापर टाळावा, गुन्हेगारी क्षेत्राकडे जाऊ नये अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डॉ.राजेश कोळी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम देवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यामुळे भविष्यात देशाला घडविणारे चांगले नागरिक व अधिकारी तयार होतील.

         या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना फेट्याची व्यवस्था सुशील तुकाराम कोळी (पल्लवी फेटेवाले, धुरखेडा) आणि कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री.हरीश मोरे (कलमाडी) यांनी निःशुल्क केले. तसेच श्री.राहुल शिरसाठ, अमोल शिरसाठ व निलेश शिरसाठ यांनी कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी, पालक व समाज बांधवांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.

         कार्यक्रमाला श्री.प्रविणजी देवरे, श्री.राज अंतुर्लीकर, डॉ.राजेश कोळी, श्री.रजेसिंग ईशी, श्री.रामेश्वर विठ्ठल साळुंखे, डॉ.गणेश शंकरराव शिरसाठ, सौ.कविताताई कोळी (जळगाव), श्री.भास्कर कुवर सर, श्री.दिनेश सोनवणे, श्री.प्रकाश शामराव सपकाळे, श्री.विनोद कोळी (कमरावद), श्री.नितीन चव्हाण, श्री.संजय भगवान निकुम, श्री.अभिलाष हसरत सावळे, श्री.ज्ञानेश्वर मका निकुम, श्री.दीपक युवराज शिरसाठ, श्री.हेमंत शिरसाठ, श्री.प्रमोद चित्ते, श्री.संजय शिंदे, सौ.दुर्गा मनोज कोळी, श्री.दिलीप साळुंखे, श्री.सतिष ईशी, श्री.हेमराज कोळी, श्री.प्रकाश कुवर, श्री.भास्कर वेंदे सर, श्री.बी. एस. कोळी, सौ.भारती पंडितराव चव्हाण, श्री.भरत शेवरे, श्री.मनोज कोळी, श्री.शामभाऊ सोनवणे, श्री.संजय येळवे, श्री.किशोर सुभाष वाकडे, श्री.संजय रघुनाथ महाले, श्री.दंगल रामदास कोळी या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर कोळी व भरत सोनवणे यांनी केले. तसेच आभार सागर कोळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आदिवासी कोळी जमात युवा मंच धुळे, सूरत फ्रेंड्स ग्रुप सूरत, आदिवासी विकास संघ, आदिवासी कोळी समाज समन्वय समिति, वाल्मिकलव्य सेना, कोळी महासंघ, अखिल भारतीय कोळी समाज धुळे-नंदूरबार, जिव्हाळा फाउंडेशन कोळी समाज, कोळी समाज सेवाभावी संस्था नंदूरबार , संघर्ष समिति जळगाव, टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, यंदा कर्तव्य आहे विवाह संस्था, आदिवासी कोळी समाज वधु-वर परिचय संस्था, कोळी जमात कर्मचारी संघटना धुळे-नंदूरबार, वाल्मीकि साम्राज्य ग्रुप, वाल्या सेना ग्रुप खांदेश, महाराष्ट्र कोळी समाज संघ, वीरांगना झलकारी बाई स्री शक्ति सामाजिक संस्था धुळे, सामाजिक हक्क संरक्षण व प्रबोधन समिति शहादा व सर्व संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते या सर्व कोळी ढोर/टोकरे कोळी अनुसूचित जमातीच्या संघटनांचे सहकार्य लाभले. प्रविण सावळे सर, सुरेश जाधव सर, हिरा वाकडे, रविंद्र सोनवणे, टोकरे कोळी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष नितीन कोळी, विकास बागुल (आफ्रिका), भैय्यासाहेब कोळी (खान्देश विभाग प्रमुख), मनोज शिरसाठ (धुळे जिल्हाध्यक्ष), मनिष शिंदे, दिलीप साळुंखे (पत्रकार), चेतन शिंदे, राहुल शिरसाठ (खेतिया), निलेश शिरसाठ, निलेश शिंदे (कमरावद), लक्ष्मण भाऊ, विकास कोळी, सचिन कोळी, सागर कोळी (अमळनेर), गोरख शिंदे (सरपंच), शिवाजी कोळी, घारू कोळी, अर्जुन शिरसाठ, विजय शिंदे (सुरत), सोनू कोळी, पंकज कोळी, किरण सोनवणे (शिरपूर), आनंद कोळी, पंकज शिरसाठ, संजय  दावळे, दिलीप शिरसाठ, नागेश वाघ, प्रा.आप्पा कोळी, किशोर महाले, लकी कोळी, महेंद्र निकुम, गणेश कोळी, निलेश शिंदे, राहुल कोळी, सागर निकुंभे, जितेंद्र कोळी, शंकर शिंदे, विशाल निकुम, गणेश निकुम, सचिन बोरसे, हेमंत कोळी, वैभव चित्ते, विशाल चित्ते, सुनिल कोळी, मयुर ठाकरे, संजय दावळे, हेमराज कोळी, दिलीप मोराणेकर, आकाश महाले, दिनेश कोळी, गोपाळ कोळी, सौरभ कोळी तसेच ज्ञात-अज्ञात जमात बांधवांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने