**दोंडाईचा पोलिसांनी 48 तासात केला घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा, दोन संशयित दोन अल्पवयीन ताब्यात, दोंडाईचा पोलिसांची कामगिरी.**
दोंडाईचा (मुस्तूफा शाह)
शहरात दि. ४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजाचे कुलूप तोडून सोने चांदीच्या दागिन्यांसह एलईडी टीव्ही रोख रक्कम असा एकूण ३ लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास होता. या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाने तपासाचे चक्रे गतिमान करत दोन संशयित व दोन अल्पवयीन मुले ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राजेंद्र बन्सीलाल जैन वय ५८ वर्ष व्यवसाय कापड व्यापारी रा. शास्त्रीनगर दोंडाईचा फिर्याद दाखल केली होती.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तपासाचे चक्रे गतिमान करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गोपनीय माहिती मिळवून सदर गुन्हा संशयित १) बिलाल युनिस खाटीक वय २८ रा. राणीपुरा दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे, २) शरद काशिनाथ भिल व २१ रा. टेक भिलाटी दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे अशांना सीतापीने ताब्यात घेऊन चोरी केलेल्या माला पैकी 50 हजार रुपये किमतीचे 500 ग्रॅम चांदी आणि 21 हजार रुपये किमतीचे तीन ग्राम सोने तसेच दहा हजार रुपये किमतीची एक एलजी कंपनीची एलईडी टीव्ही असा एकूण 81 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अस्तगत केला आहे. सदर गुन्ह्यात दोन संशयित आरोपींना अटक करून त्यांना आज दि. ६ रोजी दुपारच्या सुमारास दोंडाईचा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान गुन्ह्यातील आरोपीतांसोबत असलेल्या दोंडाईचा शहरातील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळ धुळे येथे हजर करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्यातील संशयित मुख्य आरोपी बिलाल युनिस खाटीक हा फिल्टर पाण्याचे जार वाटपाचा व्यवसाय करतो ते वाटपाच्या वेळी तो शहरातील बंद घराची माहिती घेऊन त्याचप्रमाणे त्याचे साथीदारांसह चोरी, घरफोडीचे गुन्हे करीत असल्याची माहिती दोंडाईचा पोलीसांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. त्या दिशेने सदर आरोपीतांकडून आणखी इतर चोरीचे गुन्हे उघडतीस येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दिशेने पोलिसांचा तपास कसून सुरू आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ, उपनिरीक्षक हेमंत राऊत, उपनिरीक्षक नकुल कुमावत, असई राजन दुसाने, पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम पवार, पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल अनिल धनगर, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण निकुंभे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल संदेश बैसाणे अशांनी केले आहे.
दरम्यान या घरफोडीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोने, व रोकड चोरी झाल्याने यात मुद्देमाल घेणारे आणखी आरोपी वाढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आहे.. दोंडाईचा पोलीस या घरफोडीच्या गुन्ह्यात पुढे काय तपास करतात याकडे साऱ्या शहर वाशियांचे लक्ष लागून आहे...
