आमदार राजेश पाडवी यांनी मृत कुटुंबाला शासकीय मदतीचा 4 लाख रुपयांचा धनादेश केला सुपुर्द शहादा - सुमित गिरासे




आमदार राजेश पाडवी यांनी मृत  कुटुंबाला शासकीय मदतीचा  4 लाख रुपयांचा धनादेश केला सुपुर्द 

शहादा  - सुमित गिरासे

तालुक्यातील गणोर येथील दिलीप दामू मोरे यांचा सुसरी नदीच्या  पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होते. आमदार राजेश पाडवी यांनी मृत दिलीप मोरे यांच्या कुटुंबाला शासकीय मदतीचा  4 लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसरी नदीच्या उगम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्य वृष्टी झाल्याने सहा जुलै रोजी नदीला पूर आला होता या पुराच्या पाण्यात गणोर येथील दिलीप दामू मोरे यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मोरे यांच्या पश्चात वडील पत्नी एक मुलगी व दोन मुले असा परिवार आहे घरातील कर्त्या पुरुषाचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले होते यावेळी आमदार राजेश पाटील यांनी सदर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करीत शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते आमदार पाडवी यांनी याबाबत शासकीय पातळीवर केलेल्या पाठपुरावाला यश आले असून शासनाने नैसर्गिक आपत्ती निधीतून मयत मोरे यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत मंजूर केली सदर मदतीचा धनादेश आमदार पाडवी यांच्या हस्ते 14 जुलै रोजी रविवारी मयताची  पत्नी-ईजाबाई दिलीप मोरे मुलगी- रीतीका दिलीप मोरे,मुलगा-श्याम दिलीप मोरे
 मुलगा- लखन दिलीप मोरे, वडील- दामू आठ्या मोरे कुटुंबियाकडे आमदार पाडवी यांनी समर्थ केले यावेळी नायब तहसीलदार शैलेंद्र गवते,विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे,ग्रा.प.सदस्य संजय भामरे,माजी पंचायत समिती सदस्य लगान पावरा ,भाजपा जेष्ठ कार्यकर्ते छोटू शिंदे, पिपर्डा उपसंरपच घनश्याम मराठे,सरपंच राहुल रावताळे, नामदेव वळवी,प्रमोद भामरे, अर्जुन पावरा, माजी सरपंच विठ्ठल ठाकरे, गोपाल पावरा,प्रविण वळवी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने