कुचबिहार (बंगाल) चे महाराजा श्रीमंत अनंत देव नारायणसिंह यांचे दि. 17 ला खान्देशात आगमन
शिरपूर (प्रतिनिधी)
दि. 17 फेब्रुवारी रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांना उपस्थिती देणेसाठी कुचबिहार संस्थान (प. बंगाल) चे महाराजा खासदार श्रीमंत अनंत देव नारायणसिंहजी यांचे खान्देशात आगमन होत आहे. त्यांचे सोबत श्री रामराज्य मिशन चे अध्यक्ष कुँवर श्री राजेंद्रसिंहजी नरूका (अलवर, राजस्थान) , श्रीकृष्ण जन्मभूमी , मथुरा चे मुख्य पक्षकार तथा श्री सनातन धर्मपीठाचे संस्थापक परमपूज्य श्री कौशल किशोरजी ठाकूर , विख्यात ब्लॉगर श्री रतनसिंहजी शेखावत (राजस्थान) , अँङ श्री सांखला (हरियाणा) उपस्थित
राहणार आहेत.
सकाळी 11 वाजता तामथरे ताः शिंदखेडा येथे श्री राधाकृष्ण मंदीर संस्थानाच्या गोशाळा भवनाच्या उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते संपन्न होत असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न होत आहे.
याप्रसंगी आमदार श्री जयकुमारजी रावल, श्री सरकारसाहेब रावल, श्री देवेंद्रसिंहजी रावल, श्री महाविरसिंहजी रावल उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासं भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन हभप महेंद्र महाराज व मंदीर समितीच्या पदाधिकारी मंडळाने केले आहे.
त्याच दिवशी संध्याकाळी साडे सहा वाजता शिरपूर येथे मान्यवरांचे आगमन होत असून फार्मसी कॉलेज मधील एस. एम. पटेल ऑडिटोरीअम हॉल येथे श्री क्षत्रिय विचार मंथन कार्यक्रम संपन्न होत आहे. समारोहाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती श्री भुपेशभाई पटेल उपस्थित राहणार आहेत. सदर समारोहासं उपस्थितीचे आवाहन श्री एकलिंगजी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.


