आता परिवर्तन हाच ध्यास, तुम्ही बदल घडवा मी मतदार संघ घडवतो - एडवोकेट गोवाल पाडवी
नंदुरबार प्रतिनिधी - नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गोवाल पाडवी यांनी जिल्हाभरात आपल्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या विजयासाठी दिनांक ११ रोजी नंदुरबार शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी या स्वतः प्रचार सभा घेऊन काँग्रेसच्या गड पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी हुंकार भरणार आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस मय वातावरण तयार झाले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या दहा वर्षाच्या शासनाला जनता आता कंटाळली असून सततची खोटी आश्वासने, राजकीय पक्षांची तोडफोड, भ्रष्टाचारांना दिल्ली जाणारी संरक्षण, निरप्राप लोकांना जेल मध्ये टाकून झालेली लोकशाहीची हत्या,देशातील वाढती महागाई, बेरोजगारी इ. आता जनता व युवक त्रस्त झाले असून देशात परिवर्तनाची लाट आहे. खोटे बोल पण रेटून बोल ही भाजप ची संस्कृती झाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.
आणि म्हणून नंदुरबार मतदार संघात परिवर्तन करून तुम्ही बदल घडवा मी मतदार संघ घडवतो असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी यांनी केले आहे.
जनतेने सेवेची संधी दिल्यास देशाच्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी व संविधानाचे रक्षण करण्यासाठी मी कटिबद्ध असेल अशी आश्वासन ते देत आहेत.
काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या पाच न्याय . सर्वधर्मसमभाव व देशातील धार्मिक दुही कमी करण्यासाठी, आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी आपण आम्हाला संधी द्या अशी विनंती ते करत आहेत.
मतदार संघातील सिंचनाची टक्केवारी वाढवणार असून प्रभावी सिंचन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी माझ्या प्रयत्न असेल.
आदिवासी संस्कृतीची ओळख नवा पिढीला होण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी भव्य असे आदिवासी म्युझियम तयार करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.
शेतीला वीज मिळण्यासाठी जिल्ह्यातील ट्रांसफार्मर ची संख्या वाढवणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार , शेतमालाला भाव व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे आश्वासन ते आपल्या मतदारांना देत आहे.
मुली आणि महिलांच्या सुरक्षतेची हमी यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील असू, आणि आपल्या माता भगिनींचे संरक्षण करण्यासाठी सक्षम असे कायदे तयार करून सुरक्षेची हमी देत आहे.
स्पर्धा परीक्षा व विविध भरतीसाठी युवकांसाठी जॉगिंग ट्रॅक व सुसज्ज अभ्यासिका साकारणार असून युवकांना रोजगार देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील.
प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी प्रकल्प आणून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार व स्थानिक स्थलांतर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या मालाच्या विक्री करण्यासाठी प्रयत्न करणार, बचत गट सक्षम करण्यासाठी धोरण तयार करणार.
जिल्ह्यात मोठ्या उद्योगांना आणण्यासाठी प्रयत्न करणार , असे अनेक लोकाभिमुख योजना व संकल्पना ते आपल्या प्रचारातून मांडत असून ते मतदार व युवकांना आकर्षित करत आहेत.
त्यामुळे आता परिवर्तन हाच ध्यास, तुम्ही बदल घडवा मी मतदार संघ घडवतो असे आवाहन एडवोकेट गोवाल पाडवी करत आहेत. परिवर्तनाच्या या लढत सर्व जनतेने सहभागी होऊन लोकशाहीच्या पवित्र अशा मतदानात सहभागी होऊन परिवर्तन घडवा , व काँग्रेस आणि मित्र पक्षाला देशाच्या व संविधानाच्या रक्षण करण्यासाठी संधी द्या असे आवाहन ते करत आहे.
