चार जीवांचा बळी घेणाऱ्या कारचालकावर कठोर कारवाई करा - आशा व गटप्रवर्तक संघटना यांची मागणी
शिरपूर प्रतिनिधी - जळगाव येथे 7 मे 2024 रोजी रामदेव वाडी येथील आशा सेविका त्यांची दोन मुले व भाचा यांना अज्ञात अल्पवयीन कारचालकांनी चिरडून ठार केले आहे. एकाच वेळी चार जीवांच्या बडी घेणाऱ्या कारचालकावर कठोर कारवाई करून आशा स्वयंसेविकाला न्याय द्यावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी धुळे व उपविभागीय अधिकारी शिरपूर आणि तहसीलदार शिरपूर यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वयंसेविका वत्सलाबाई सरदार चव्हाण राहणार रामवाडी जिल्हा जळगाव येथे राहत असून रामदेव वाडी येथे आशा वर्कर म्हणून काम करत होत्या 7 मे 2024 रोजी रामदेव वाडी येथे अशा सेविकेची ड्युटी करून दोन मुले व भाच्या यांच्यासह दुचाकीवरून शिरसोली येथे जात असताना दुपारी 4 वाजून 45 वाजता गावाच्या पुढे कार क्रमांक एम एच 19 सी व्ही 67 67 या कारणे दुचाकीला जोरदार धडक दिली असता व वत्सलाबाई सरदार चव्हाण वय 27, मुलगा सोमेश वय 2 यांच्या जागीच मृत्यू झाला तर सोहम वय 7 आणि भाचां लक्ष्मण भास्कर राठोड वय 12 यांच्या उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.सदर घटनेने चव्हाण कुटुंबावर दुःखाच्या डोंगर कोसळला या घटनेला 17 दिवस झाले असून देखील अज्ञात कारचालकावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. या दुर्दैवी घटनेत सदरच्या कारचालकाने एकाच कुटुंबातील चार लोकांना चिडून काढले असून अल्पवयीन कार चालकावर आणि कारमालकावर कारवाई करून अटक करण्यात यावी व कठोरातील कठोर शिक्षा करावी आणि कोरोना युद्ध अशा स्वयंसेविका वत्सला सरदार चव्हाण यांना न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आले आहे.
सदरच्या निवेदनावर आशा व गटप्रवर्तक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी सह्या केल्या आहेत.
