थाळनेरला कृषी केंद्रांची अचानक तपासणी




थाळनेरला कृषी केंद्रांची 
अचानक तपासणी 

थाळनेर (प्रतिनिधी)
 शिरपूर तालुक्यातील थाळनेर व परिसरातील कृषीसेवा केंद्रांची कृषी विभागाच्या भरारी पथकाने अचानक तपासणी करण्यात आली. बियाणे व रासायनिक खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 
  खरीप हंगामास सुरुवात झाल्यानंतर काही कापूस वाणाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली होती


.
धुळे जिल्हा कृषी अधीक्षक  कैलास शिरसाठ, धुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, शिरपूर तालुका कृषी अधिकारी संजय पवार, शिरपूर पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी राजेश चौधरी आदींनी बियाणे व खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर येथील में. श्वेता एजन्सीज, मानसी कृषीसेवा केंद्र आदी ठिकाणी मंडळ कृषी अधिकारी मुकुंद धोढरे, कृषी पर्यवेक्षक किरण पाटील, कृषी सहाय्यक सुनील सोनवणे, योगेश पवार आदींनी अचानक भेट देत कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. या तपासणीत शेतकऱ्यांची ज्या कापूस वाणाना मागणी आहे त्याबाबत साठा रजिस्टर, शेतकऱ्यांचे पावत्या, भाव फलक आदीची तपासणी करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना व बिलावरील शेतकऱ्यांना मोबाईलवर संपर्क साधून चौकशी करण्यात आली.


  शेतकऱ्यांनी बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडून घेऊन पक्के बिल घ्यावे. तसेच कोणी कापूस बियाण्यांचा काळाबाजार करत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करावी असे आव्हान कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने