व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे नाशिक येथे पार पडले भव्य आदीवेशन




व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे नाशिक येथे पार पडले भव्य आदीवेशन

नाशिक - निरपेक्ष व निर्भीड पत्रकारिता करा, मैत्री सर्वांशी ठेवा, पण पत्रकारिता करतांना पत्रकाराचाच धर्म पाळा, राजकारणातील अपप्रवृत्ती दूर झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी नाशिक येथील अधिवेशनात केले आहे,



व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन नाशिकमध्ये झाले, त्यावेळी उद्घाटनप्रसंगी वानखेडे बोलत होते, राज्यातील पत्रकारांच्या पाल्यांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्य वितरण सोहळ्याचा शुभारंभ व ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार सोहळा स्पोर्ट क्लब, गरुडझेप अकॅडमी येथे झाला, यावेळी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका अध्यक्ष प्रदीप दीक्षित यांची उत्कृष्ट तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले,



व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे अध्यक्षस्थानी होते, प्रमुख अतिथी म्हणून प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, डॉ. श्रीकांत सोनवणे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील  यावेळी उपस्थित होते,



वानखेडे पुढे म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक्स पत्रकारिता सर्वदूर पोहोचत असल्याने ग्लॅमर आहे, मात्र, तरीसुध्दा काहीतरी नवे शोधण्याची आणि वाचक, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची वृत्ती पत्रकारांनी कायम ठेवायला हवी, यावेळी त्यांनी आलेले अनुभव सांगितले, जीवनात अनेक बरे- वाईट प्रसंग आले, निर्भीडपणे मी ते हाताळले, लोकशाही मूल्ये रूजवण्यासाठी दिल्ली, मुंबईपेक्षा ग्रामीण, निमशहरी भागातील पत्रकार अधिक झपाटून काम करतात, असे गौरवोद्गार त्यांनी काढले व या पत्रकारांच्या मूलभूत समस्या सुटल्या तर ते अधिक जोमाने चांगली पत्रकारिता करतील, असा विशवास व्यक्त केला, पत्रकारिता हे दुधारी शस्त्र तोलून- मापून विचाराअंती हाताळायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले,

पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले,  यावेळी धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांच्यासह धुळे तालुका अध्यक्ष संदीप त्रिभुवन, धुळे शहर अध्यक्ष सोपान दिसले, शिरपूर तालुका अध्यक्ष भिका चव्हाण, साक्री तालुकाध्यक्ष राजेंद्र गवळी, शिंदखेडा तालुकाध्यक्ष प्रदीप दिक्षित यांच्यासह महेंद्र माळी,महेंद्र जाधव, उबेद कादरी, ऋषिकेश अहिरराव, अख्तर शहा, महेंद्र राजपूत, भिलाजी जिरे, विशाल बेनुस्कर, नितीन पाटील, अजिम शेख, मनोज चौधरी, सुनिल पाटील, टेंभेकर, अनिल वाघ, सुभाष जगताप, महेश गुजराती, आर के पवार, उदय पाठक, महेंद्र जाधव, अंबादास बेनुष्कार, बाबा बच्छाव उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने