शिरपुर : बारा बलुतेदार महासंघ प्रदेश सदस्यपदी योगीराज विश्वनाथ बोरसे (शिंपी) रा. शिरपूर जि.धुळे यांची नुकतीच निवड जाहिर करण्यात आली आहे. बारा बलुतेदार महासंघ प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी जालना येथे आपल्या निवासस्थानी योगीराज बोरसे यांना (दि. १९ मे) रोजी नियुक्ती पत्र देवुन सत्कार केला. नियुक्ती पत्र देतेवेळी बारा बलुतेदार महासंघ उत्तर महाराष्ट्र कार्यध्यक्ष एकनाथराव बोरसे, मोहन इंगळे उपस्थित होते. बारा बलुतेदार महासंघ प्रदेश सदस्यपदी योगीराज विश्वनाथ बोरसे यांची नियुक्ती झाल्याबद्दल धुळे जिल्हाध्यक्ष प्रकाश गुरव, वरीष्ठ सल्लागार अरुण धोबी, शहराध्यक्ष रमेश चौधरी, जिल्हा कार्यध्यक्ष सुभाष लोहार, गिरिष कुंभार, रविंद्र भोई, राधेश्याम भोई आदिंनी अभिनंदन केले आहे. बारा बलुतेदार महासंघ प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी योगीराज बोरसे यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपल्या सामाजिक कार्याची संघटनात्मक कौशल्याची प्रती असलेली दृढ विश्वासाची दखल घेऊन बारा बलुतेदार महासंघ प्रदेश सदस्य या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. सदरील नियुक्ती पुढील आदेशापर्यंत अबाधित असेल. नियुक्ती दरम्यान आपण घटना नियम, नियमावली अनुसरुनच कार्य करावे. आपण आपला जास्तीत जास्त वेळ संघटनेला देऊन संघटना बळकट होण्यासाठी जोमाने कामास लागावे. आपल्या कार्यास माझ्या हार्दीक शुभेच्छा. व आपल्या नियुक्ती प्रित्यर्थ अभिनंदन असे कल्याणराव दळे प्रदेशाध्यक्ष यांनी म्हटले आहे. योगीराज बोरसे यांनी यापुर्वी महासंघाचे विविध पदांवर यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदस्यपदी योगीराज बोरसे