फेस बामखेडा परिसरात वादळ वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी,
शहादा प्रतिनिधी - शहादा तालुक्यातील फेस बामखेडा येथे दिनांक 17 रोजी अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे वादळ वाऱ्यासह पावसाचे जोरदार हजेरी लावल्याने घरातील नागरिक हैराण झाल्याचे दिसून आले आहे, याबाबत अधिक माहिती अशी की शहादा शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील बामखेडा म्हणून परिसर आहे या परिसरात अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे वादळ वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली या आलेला अवकाळी पावसामुळे परिसरातील शेती पिकासह गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समजते तसेच शहादा ते शिरपूर या मुख्य मार्गावर फेस बामखेडा हे गाव असल्यामुळे वादळ वाऱ्यासह अनेक झाडे रस्त्यावर पडली असल्याने काही तास वाहनांची मोठी कोंडी झाली होती, तसेच विद्युत तारा देखील तूटल्या कारणाने वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता, बाणखेडा परिसरात रस्त्या लागतात ह्या विद्युत तारा लोमत्या अवस्थेत दिसून आल्या ठिकठिकाणी पावसाच्या साचलेला पाण्याच्या डबके मोठ्या प्रमाणावर दिसून आले
