यालाच म्हणतात लोकशाही व परिवर्तनाची लाट!.पाहु 4जुनला निकालाची वाट!!
लोकसभा निवडणुकीच्या तिसरा टप्पा नुकताच महाराष्ट्रात पार पडला.उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये भा.ज.प.विरोधी परिवर्तनाची लाट दिसुन येत होती.दि. 13/05/2024 ला महाराष्ट्रातील १८वी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पार पडली त्यात नंदुरबार,रावेर,जळगाव,हे उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघ होते.
नंदुरबार व रावेर हे मतदारसंघ मध्यप्रदेश चा हद्दीस लागुन व नंदुरबार हा मतदार संघ गुजरात चा व महाराष्ट्राचा हद्दीपासून सुरुवात होतो.आदिवासीबहुल राखीव मतसंघाचे 2014पासुन भा.ज.प.चे खासदार डाॅ.हिनाताई गावित हे प्रतिनिधित्व करीत होते..रावेर मतदारसंघात देखिल भा.ज.प.चा रक्षा खडसे प्रतिनिधित्व करीत आहेत.या दोघे महिला खासदार याना 2014,2019ची निवडणुक सोपी वाटली होती .तशीच यावेळेला देखील. बिनधास्त पणे निवडणुक जिंकु अशी वाटणारी निवडणुक. दोघींना दमछाक करणारी ठरली आहे.
नंदुरबार मतदारसंघातील भा.ज.प चे उमेदवार यानी तर शेवटचा टप्यात नरेंद्र मोदी ,एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस याच्या सभा घ्याव्या लागल्या.वास्तविक पहाता अँड गोवाल पाडवी हे नवखे उमेदवार होते.त्यांचे वडील आमदार अँड. के.सी.पाडवी यांचे चिरंजीव ऐवढीच त्यांची ओळख होती.डाॅ.हिनाताई गावित यांचा विरोधात कुणी उमेदवारी करण्यास उत्सुक नसताना .
अँड. गोवाल पाडवी यानी उमेदवारी करुन हिम्मत दाखवली व त्यानी प्रचाराला देखील सुरुवात केली.याच दरम्यान काँग्रेसचे अँड. पद्माकर वळवी यानी काँग्रेस पक्षाला सोडुन भा.ज.प.त.प्रवेश केला.
अशा प्रतिकूल परिस्थितीत नंदुरबार मतदारसंघातील इंडीया आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार गट,शिवसेना उ.ब.ठा गट,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष,आप,आदिवासी संघटना आणि मुन्ना दादा रावल, अभिजीत पाटील, आणि प्रतिभाताई शिंदे यानी एकजुटीने प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तसेच मतदार देखिल या निवडणुकीत सक्रिय होते.मोदी भा.ज.प सरकार चा विरोधात संतापाची लाट दिसुन येत होती.त्यात प्रामुख्याने शेतकरी वर्गात व आदिवासी बांधवा मध्ये प्रखरपणे विरोध जाणवत होता .ऐकी कडे लोकप्रतिनिधी ऐकी कडे जनता असा संघर्ष या निवडणुकी दिसुन आला.दि. 11/05/2024ची प्रियंका गांधीची नंदुरबार मधील सभा निर्णांयक ठरली रेकार्ड ब्रेक सभा ठरली. प्रियांका गांधी.याचे संपूर्ण भाषणात नरेंद्र मोदीचा प्रत्येक मुद्दा खोडून काढला.सत्य परिस्थितीत ठासून मांडली .मतदारांनी देखील लाखोंचा संख्येत प्रतिसाद दिला.सभा संपेपर्यंत मतदार सभेचा ठीकाणी लोक येताना पाहिले.व आलेला मतदार सभेत येताना उत्साहित दिसुन येत होता.या सभेमुळेच भा.ज.प चा उमेदवार स मतदारांना विकत घेण्याची पाळी आली असा आरोप होत आहे.
खाजगीत भा.ज.प चा कार्यकर्त्यांने असे सागितले की आमचा उमेदवार पडु शकत नाही.30कोटी रुपये मतदारांना वाटप केलेले आहेत. आणि जर खरोखर असे पैसे वाटले असतील तर तुमचा उमेदवार चा नैतिक पराभव आहे.
विकासाचा गप्पा मारणार्याना पैशाचा वाटप संपुर्ण मतदार संघात मतांची भीक मागून संघर्ष करावा लागतो. जो पक्ष भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न लोकांना दाखवत होता तोच भ्रष्टाचाराचे पैसे निवडणुकीत वाटत होता असे व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाले.
काहि मतदाराचा असे मत होते की तीन खिडकी योजनेचा पैशा आहे.घ्या परंतु मतदान पंजालाच करा!असे देखील लोक सांगत होते.मोदीचा जुमला कीती खोटा आहे.चोराना चोर म्हणतो. परंतु भा.ज.पात आला का साधु म्हणतो.
लबाड देखील कीती बोलव याची देखील मर्यादा असते.भा.ज.प.वाले जनतेला काय मूर्ख समजतात.
शेतकरी हमी भावची मागणी करतोय!वनजमीन कसणारा शेतकरी 7/12ची मागणी करतोय कामगार हक्काची नोकरी मागतोय.महागाई चे चटके सर्वाना बसतायत म्हणून च शेतकरी,शेतमजूर,कामगार,आदिवासी,युवक यांना कळुन चुकलेकी भा.ज.पा सत्तेसाठी काहीपण करु शकतो.म्हणुनच भा.ज.प हटाव देश बचाव हिच खरी परिवर्तनाची लाट!
.मतदारांमध्ये संतापाची व परिवर्तनाची लाट होती.म्हणून उत्तर महाराष्ट्रातील तीन्हीही मतदारसंघात भा.ज पा.ने साम ,दाम दंड वापरुन हि निवडणुक लढवली आहे.त्याचां पराभव 13/05/2024चा मतपेटीत बंद झाले आहे.यदाकदाचित त्याचा विजय झाला तर तो मतदारांकडून नव्हे तर तो सत्तेचा गैरवापर करुन होईल. यात किंचितही शंका नाहि.नंदुरबार लोकसभेची निवडणूक अँड. गोवाल पाडवीचा बाजुने मतदारांनी हातात घेतली होती.लोकप्रतिनिधी हे बघुन थक्कच झाले आहेत.
यालाच म्हणतात लोकशाही व परिवर्तनाची लाट!.पाहु 4जुनला निकालाची वाट!!
अँड. हिरालाल परदेशी.
प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा , महाराष्ट्र.
