विनायक सैंदाणे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती*



*विनायक सैंदाणे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती*


धुळे जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक ओंकार सैंदाणे यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल धुळे जिल्हा विशेष शाखेच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी त्यांचा सन्मान केला आहे. यावेळी पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक गायकवाड व जिल्हा विशेष शाखेतील सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
विनायक सैंदाणे जिल्हा वाहतूक शाखेचा कारभार सांभाळत आहेत.  धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अनेक पोलिसांना पदोन्नती दिली असून सहायक पोलिस उपनिरीक्षक विनायक ओंकार सैंदाणे यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. विनायक सैंदाणे हे सन 1989 साली ठाणे येथे पोलीस खात्यात कॉन्स्टेबल पदावर रुजू झाले या काळात त्यांनी ठाणे ग्रामीण, वसई, विरार त्यानंतर धुळे जिल्हा, शहादा, नंदुरबार तालुका, रनाळा, म्हसावद नंतर धुळे बॉम्ब शोध पथक, पोलिस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे नोकरी केली. त्यानंतर 2014 साली हेड कॉन्स्टेबल पदावर पदोन्नती मिळाली. 2021 साली सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली तर फेब्रुवारी 2024 मध्ये सहा. पोलीस उपनिरीक्षक पदावरून पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. या बद्दल जिल्हा विशेष शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी त्यांचा सन्मान केला आहे
 पोलीस उपनिरीक्षक विनायक सैंदाणे हे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी नेहमीच पुढे असतात. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांनी त्यांच्या मित्र परिवार व नातेवाईकांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने