नंदुरबार मतदार संघात भाजप उमेदवारांचा कडवा विरोध निर्धार मेळावा घेऊन भाजप चा बहिष्कार, काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन




नंदुरबार मतदार संघात भाजप उमेदवारांचा कडवा विरोध 

निर्धार मेळावा घेऊन भाजप चा बहिष्कार, काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन

शहादा प्रतिनिधी -  लोकसभेच्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर हिना ताई गावित व गावित परिवारावर विविध प्रकारचे आरोप लावण्यात येऊन या परिवाराच्या विरोध करत भाजपला मतदान न करण्याच्या निर्णय सर्वानुमते शहादा येथील एका जाहीर सभेत घेण्यात आला. आणि या वेळेस काँग्रेस उमेदवाराला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे एकेकाळी डॉक्टर विजयकुमार गावित यांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मुन्ना दादा रावल ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी भाजप विरोधी व गावित परिवार विरोधी कार्यकर्त्यांची मोट बांधून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळावा काल शहादा येथे पार पडण्यात आला. यावेळेस सरळ कार्यकर्त्यांना विचारण्यात आली की आपण आपली भावना सांगा तुम्ही सांगाल त्या दिशेने आम्ही काम करायला तयार आहोत. त्यावेळी जनतेने आम्ही सर्व काँग्रेस सोबत आहोत अशा घोषणा दिल्या. त्यामुळे आता जवळच्या मानले जाणाऱ्या सहकाऱ्यांकडून नंदुरबार मतदार संघात कडवे आव्हान उभे केले जात असून यामुळे भाजप उमेदवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

या सभेत बोलताना मुन्ना दादा रावल यांनी म्हणाले की या देशात जनता व जनतेच्या आदेश सर्व मान्य असतो. आम्हाला वारंवार जनतेसमोर यावे लागते. त्यामुळे आम्ही जनतेच्या भावनांचा आदर करतो. डॉक्टर हिना गावित यांना भारतीय जनता पार्टीत मी  आणले होते. मात्र मागील काही वर्षांपासून  स्थिती अत्यंत विपरीत झाली असून या तालुक्यात हुकूमशाही व ठेकेदारी शाही सुरू झाली आहे. या तालुक्यात कार्यकर्त्यांना किंमत राहिली नाही, ठेकेदाराला किंमत मिळायला लागली, मात्र त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ठेकेदार कधीही कार्यकर्ता होऊ शकत नाही कार्यकर्ता हा मातीत ना जन्मावा लागतो तो संघर्षाने निर्माण होतो. त्यामुळे या तालुक्यात कार्यकर्ता जिवंत ठेवायचे असेल तर तुम्हाला कठोर निर्णय घेऊन यांना यांची जागा दाखवावी लागेल. तालुक्यात सरपंचांची परिस्थिती वाईट आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर टक्केवारी सुरू आहे ठेकेदारांची दादागिरी सुरू आहे, ठेकेदारांची चुकीचे अक्कल शिकवल्यामुळे विकास कामांच्या बाजार मांडला गेला. त्यामुळे यापुढे जर लोकप्रतिनिधींच्या सन्मान ठेवायचे असेल तर अशा ठेकेदार शाही गुंडांना गावात प्रवेश बंदी केली पाहिजे. आता सन्मान जागृत ठेवून यांना जाब विचारला पाहिजे असे आव्हान केले. त्यामुळे त्यांनी गावित परिवाराच्या ध्येय धोरणावर टीका करून यापुढे त्यांना धडा शिकवण्याची जनतेला आव्हान केले.

याच सभेत अभिजीत पाटील यांनी म्हटले की केंद्रात कोणाची सत्ता येईल ते ठरवणे इतके आपण मोठे नाही मात्र नंदुरबार जिल्ह्यातील कष्टकरी जनता व्यापारी शेतकरी उद्योजक यांनी निर्णय घेतला आहे की या निवडणुकीत डॉक्टर हिना गावित यांना मदत न करता काँग्रेसच्या हात बळकट करायचे आहे. काँग्रेस उमेदवारावर नवीन असल्याचा आरोप केला जातो मात्र 2014 च्या निवडणुकीत आपण देखील नवीन होतात हे विसरायला नको. यावेळी परिवर्तनाच्या हवेत खोट्या भुलतापांना बळी पडून लोकांनी आपल्याला निवडून दिले. त्यामुळे तुमच्या दहा वर्षाच्या कामकाज पाहता या वेळी आम्ही काँग्रेस उमेदवाराला मदत करणार आहोत 
जर भविष्यात काँग्रेस उमेदवाराने चांगले काम केले नाही तर लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींचे लायसन रिन्यूअल करण्याचे अधिकार मतदारांच्या हातात असतो. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची ही दहशत आपण मोडून काढली पाहिजे नाहीतर लोकशाहीला अर्थ काय? गावित परिवार राजकारणातून स्वतःच्या परिवाराच्या स्वार्थ साधत असून घराणेशाही त्यांनी निर्माण केली आहे. त्यामुळे आमच्या कोणत्याही पक्षाला विरोध नाही मात्र गावित परिवाराला विरोध कायम असून  यांना मतदानातून धडा शिकवा असे आवाहन त्यांनी जनतेला केले. आणि कामाला लागा असा आदेश दिला.

सदर कार्यक्रमासाठी सर्वच पक्षांना मानणारे विविध राजकीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

त्यामुळे आता नंदुरबार मतदार संघात अंतर्गत कलह निर्माण होऊन भाजप उमेदवाराच्या विरोधात जनतेची नाराजी वाढत गेल्यास त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने