*रोटरी स्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन*
दोडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार उच्चविद्याविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक यांच्या हस्ते डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कु.पूर्वा जाधव व कु.ओवी बिरारीस यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने व चिकाटीने शिक्षण घेतले व विद्याव्यासंगी झाले. विषम समाजरचनेत असणारी भेदाभेद वृत्ती दूर करुन अस्पृश्य, महिला, दलित यांना जीवनाचा नवा मार्ग दाखवले असल्याचे आपल्या मनोगतातून म्हटले.
श्री डी.एम.पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांचा जीवनातील शैक्षणिक प्रवास संघर्षमय होता.ज्ञानसंपादनासाठी ते आयुष्यभर विद्यार्थी राहिले. तत्कालीन भारतीय समाजातील विषमता नष्ट करून समतेवर आधारित नवसमाज निर्माण करण्याचे बाबासाहेबांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले.
तर प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक अध्यक्षीय भाषणात डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा उल्लेख करताना म्हणाले की, तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे बहुजन समाज हा शिक्षणापासून वंचित राहिला; म्हणून देशाची प्रगती झाली नाही. त्यांनी शिक्षण हे समाजविकास व देशविकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. त्यांच्या अभ्यासूवृत्तीचे अनुकरण केल्यास विदयार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उज्वल होईल.
सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ललिता गिरासे यांनी केले.
