मा.देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री व ऊर्जामंत्री वीज कंपनीतील महिलेच्या झालेल्या निर्गुण हत्या कडे लक्ष देतील काय?*
कॉ नाना पाटील यांचीमागणी
दोडाईचा (मुस्तफा शाह)
महाराष्ट्र राज्यात आज न भूतो न भविष्य अशी घटना घडली,देशाच्या वीज उद्योगात प्रथम क्रमांकावर असलेली महावितरण कंपनीतील महिला कर्मचारी सौ.रिंकू बनसोडे हिची एका माथेफिरू वीज ग्राहकाने महावितरण कंपनीच्या कार्यालयात येऊन निर्गुण पणे हत्या केली. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी निश्चितच आहे.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. महावितरण कंपनी ही राज्यातील ३ कोटीच्या वर वीज ग्राहकाच्या मालकीची कंपनी आहे.या कंपनीत काम करणारे कर्मचारी,अभिंयते व अधिकारी हे ग्राहकाचे सेवक म्हणून अविरतपणे २४ तास वीज पुरवठा करत असतात.सेवा देत असताना शेकडो कर्मचारी शॉक लागून अपघाताने मृत्युमुखी पडलेले आहेत.कोरोना काळात या कर्मचाऱ्यांनी केलेली सेवा ही तर सर्वोच्च सेवा होती. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची निर्मिती ही ना नफा ना तोटा या तत्त्वावरती तत्कालीन सरकारने १ मे १९६० रोजी केली होती. याच विद्युत मंडळाच्या योगदानामुळे महाराष्ट्राची औद्योगिक,कृषी व इतर क्षेत्रात क्रांती झाली हे कोणीही नाकारू शकत नाही.विद्युत मंडळाचे २००३ ला विभाजन झाले व निर्मिती,पारेषण व वितरण या तिनं कंपन्या सरकारच्या मालकीच्या अधिपत्याखाली काम करू लागल्या. या कंपनीवर सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे. या वीज कंपन्या स्वतंत्रपणे कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही.
विविध वेळेस विविध पक्षाचे सरकार असताना कधी वीज ग्राहकाला मोफत वीज,कधी वीज बिल माफीची घोषणा, कधी शेतकरी अडचणीत आहे म्हणून शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कपात करू नका,यामुळे राज्यातील महावितरण कंपनी आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेली आहे.या कंपन्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याकरीता सरकारने मूलभूत उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. वीज कंपन्या आर्थिक अडचणीत आहे म्हणून या कंपन्यांचे खाजगीकरण केल्याशिवाय पर्याय नाही असेच सर्वच राजकीय पक्ष म्हणत असतात.पण मुळात यांची आर्थिक परिस्थिती खराब होण्यास कोण कारणीभूत आहे.याचा विचार मात्र केल्या जात नाही. सामान्य विज ग्राहकांना याची कल्पना नसते,त्यामुळे वीज कर्मचारी जेव्हा वीज ग्राहकांच्या दारापर्यंत विज बिल वसुली करिता जातो तेव्हा,त्या ग्राहकाचा सर्व रोष त्या कर्मचाऱ्यावर असतो.ग्राहक हे वीज कर्मचाऱ्याला गुन्हेगार समजतात. एकीकडे प्रशासनाचा दबाव व दुसरीकडे ग्राहकाचा दबाव या चक्रविहा मध्ये वीज कर्मचारी पूर्ण भरडून गेलेला आहे.
सध्या महावितरण कंपनीतील लाईनवन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकच काम शिल्लक आहे,ते म्हणजे फक्त वसुली,वसुली,वसुली कोणत्याही पद्धतीचे मेंटेनन्स केल्या जात नाही.वीज कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामाकरीता मटरेल उपलब्ध होत नाही.प्रशासनाचे जे नियोजन पाहिजे त्याचा अभाव,ठेकेदाराकडून केलेल्या कामांमध्ये गुणवत्ता नाही,इनपॅनेल्मेटच्या कामामध्ये प्रचंड उधळपट्टी, प्रत्येक कामामध्ये बोकाळलेली ठेकेदारी पद्धती,सुरक्षेच्या साधनाचा अभाव,कमकुवत व जरजर झालेली यंत्रणा, पायाभूत सुविधाच्या कामामध्ये गुणवत्ता नसणे,त्यामुळे शेकडो कर्मचारी वर्षाला मृत्युमुखी पडतात.याकडे सरकार व प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे.
आजच्या घटनेमुळे महाराष्ट्र पूर्ण हादरलेला आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातल्या माणसाला आपल्या सुरक्षेची काळजी वाटू लागलेली आहे.कुटुंबाचा कर्ता माणूस घरातून गेल्यानंतर त्या कुटुंबावर काय प्रसंग येतो हे त्या घरातील व्यक्तीला जास्त माहीत आहे. आपण सगळे संवेदना व्यक्त करून मोकळे होतो.कुटुंबावर झालेला आघात हा अनंतकाळ त्या कुटुंबाला सहन करावा लागतो.सामाजिक सेवेत काम करणाऱ्या एका स्त्रीची कोणतेही कारण नसताना झालेली निर्गुण हत्या ही पुरोगामी महाराष्ट्राला शोभनावह नाही.मा.देवेंद्रजी फडणवीस आपण राज्याचे गृहमंत्री आहात पण ऊर्जा खाताचे मंत्री सुद्धा आहात.आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. या घटनेनंतर इथून पुढे वीज ग्राहकाकडे वसुलीला जायचं किंवा नाही हा प्रश्न विज कर्मचाऱ्यांना पडलेला आहे.वसुलीला गेले तर आम्हाला संरक्षण मिळणार काय ? हाही प्रश्न कर्मचारी कामगार संघटनांना विचारत आहे.अत्यंत गंभीर वळणावर वीज कर्मचाऱ्यांची स्थिती आहे. वीज कर्मचाऱ्यांना कामाचे तास शिल्लक राहिलेले नाही.इमर्जन्सी सेवेच्या नावाखाली शोषणावर आधारित पद्धत ही राज्यात सुरू झालेली आहे. याला आपण वाचा फोडणार आहात काय ?. आपण लक्ष घालून तातडीने वीज बिल वसुली करीता स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी.सोबतच सौ. रिंकू बनसोडेचा निर्गुण खून झाला याकरीता स्वतंत्र न्यायालय गठीत करून व,फास्टट्रॅकवर सुनावणी होऊन आरोपीला मृत्यू दंडासारखीच शिक्षा व्हावी हीच अपेक्षा सदर द्वार सभेला कामगार संघ वर्कस फेडरेशन तांत्रिक संघटना मागासवर्गी संघटना अभियंता संघटना यांचे पदाधिकारी यांनी मार्गदर्शन नाना पाटील डिपी ढाकुर अनिल माळी डिंगाब र भदाणे सुरेद्र गिरासे श्री वसावे साहेब अतिरिक्त कार्यकारी मंडळ किरण पाटील प्रफुल्ल गिरासेयांनी मार्गदर्शन केले केले समिती सदस्य कॉ नाना पाटील दोंडाईचा
