अनरद येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
शहादा प्रतिनिधी- अनरद तालुका शहादा येथे सावता फाउंडेशन तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची १९७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील ज्येष्ठ नागरिक लोटन माळी, सावता फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र माळी,आई रेणुका देवी संस्थानचे सचिव प्रा.ज्ञानी कुलकर्णी यांनी प्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजेंद्र माळी प्रा. ज्ञानी कुलकर्णी यांनी महात्मा फुले यांचा सामाजिक कार्याचा गौरव आपल्या मनोगतातून व्यक्त केला. याप्रसंगी गावातील दशरथ माळी, कौतिक माळी, लोटन माळी, सुरेश माळी, प्रताप माळी,ज्ञानेश्वर माळी, हिरालाल माळी, महाजन पोलीस, धुडकु माळी, निंबा माळी, जिजाबराव पाटील, किशोर गिरासे, सदानंद माळी प्रवीण माळी, मनोज वाघ, मनोज माळी, दत्तू महिदे, दिनेश माळी, सुनील पाटील, गोपाल माळी, पुनम माळी, मुन्ना माळी, गंगाधर माळी, दत्तू माळी, मुकेश माळी, चेतन माळी, योगेश माळी, नानाभाऊ माळी, आदी अनरदकर उपस्थित होते.उपस्थितांनी देखील म.फुले यांची प्रतिमा पूजन करून यांना अभिवादन केले.
