संशयित जादूटोणा प्रकरणाची शहर पोलिसांकडून दखल
खाजगी व संस्थांचे हॉस्टेल चालक व मालक यांची मिटींग घेऊन सुरक्षे संदर्भात सुचना
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरातील एका खाजगी वस्तीगृहात घडलेल्या संशयित जादूटोणा प्रकरणाची शहर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत याबाबत तपास सुरू केला असून विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यकता सूचना देण्यासाठी शिरपूर शहर पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी खाजगी व संस्थांचे हॉटेल चालक व मालक यांची मीटिंग घेऊन सुरक्षा संदर्भात सूचना देण्यात आले आहेत.
यावेळी पोलिसांनी असे मत व्यक्त केले आहे की आमच्या असे निदर्शनास आलेले आहे की शिरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बाहेर गावाचे विद्यार्थी व विद्याथीनी शिक्षणासाठी आलेले असुन ते शिरपूर शहरामध्ये काही खाजगी हॉस्टेलमध्ये रुम करून तसेच काही भाडेतत्वावर रुम घेऊन राहत आहेत. परंतु हॉस्टेल मालक चालक हे हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या विद्यार्थी किवा विद्यार्थीनींची कोणत्याही प्रकारची खात्रो न करता किंवा त्यांच्या विषयी आवश्यक असलेली सखोल माहिती न घेता विद्यार्थ्यांना राहण्यासाठी रुम भाड्याने देत असतात. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलचे मालक चालक किवा घरमालक यांच्याकडे काही तक्रार केल्यास ते त्यांच्या तक्रारीची दखल घेत नाहीत. तसेच अनेक विद्यार्थी व विद्यार्थानी हे रात्रीच्या वेळेस उशिरा पर्यंत बाहेर फिरतांना आढळुन येतात. त्यांच्यावरती हॉस्टेल चालक मालक घरमालक यांचा अंकुश नसल्याचे दिसुन येते. तसेच काही हॉस्टेलमध्ये / खाजगी घरमालक हे शिकणाऱ्या मुलीसोबत नोकरी करणाऱ्या किंवा इतर काम करणाऱ्या मुलींना देखील एकत्रीत रित्या ठेवतात असे दिसून आलेले आहे. त्यामुळे देखील काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आम्ही आज शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे शिरपूर शहरातील काही खाजगी व काही संस्थांचे हॉस्टेल चालक व मालक यांची मिटींग घेऊन त्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षे संदर्भात खालील प्रमाणे योग्य त्या सुचना दिलेल्या आहेत.
१) हॉस्टेल मध्ये अॅडमिशनसाठी आलेल्या विद्यार्थी विद्यार्थीनीचा फोटो लावून तिची व तिच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती असलेला फॉर्म भरुन घ्यावा व त्यांच्या कडुन फोटो आयडी घेण्यात यावेत व ती फोटो आयडो देखील खरी आहे किंवा नाही याबाबत इतर कागदपत्रांवरुन खात्री करुन घ्यावी.
२) हॉस्टेलमध्ये २४ तास रेक्टर ठेवणे आवश्यक आहे.
३) रात्रीच्यावेळी खासकरुन ०९.०० ते १०.०० वाजेनंतर बाहेर जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्या जाण्या- येण्याची नोंद ठेवण्यात यावी व काही महत्वाचे काम असल्याशिवाय कोणालाही रात्री उशीरा बाहेर फिरण्याची परवानगी देऊ नये.
४) काही विद्यार्थी / विद्यार्थीनी यांच्या वर्तनुकीबाचत काही संशय वाटत असल्यास तात्काळ त्यांच्या पालकांना कळविण्यात यावे.
५) आपल्या हॉस्टेल मध्ये राहणा-या विद्यार्थी / विद्यार्थीनींचे समुपदेशन करण्याची आवश्यकता असल्यास शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे महिला पोउनि व त्यांच्या सोबत ४ महिला पोलीस अंमलदार यांची दामिनी पथकात नेमणुक करण्यात आलेली आहे. सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आपण बोलावुन आपल्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करु शकतात.
६) हॉस्टेलच्या आतमध्ये व बाहेर योग्य त्या प्रमाणात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावेत व पुरेश्या प्रमाणात लाईटची व्यवस्था करावी.
विद्याथी/ विद्यार्थीनींच्या सुरक्षे संदर्भात कोणतीही अडचण असल्यास तात्काळ शिरपूर शहर पोलीस स्टेशन संपर्क करावे अशा सूचना शिरपूर शहर पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी दिले आहेत.

