जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्ष पदी संजय दुगड व सचिव पदी दिनेश कर्णावट यांची स्तुत्य निवड
दोडाईचा (मुस्तफा शाह)
दोंडाईचा येथील जैन सोशल ग्रुपची नुकतीच बैठक झाली. त्यात 2024-25 या वर्षासाठी हस्ती कोऑपरेटिव बैंकेचे संचालक संजय दुगड यांची सर्वानुमते अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
जैन सोशल ग्रुपची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली त्यात
संस्थापक अध्यक्ष रमेश पारख, सचिव दिनेश कर्णावट ,उपाध्यक्ष सीए भिकम बोथरा,सह सचिव कमलेश कांकरिया,कोषाध्यक्ष सुनिल खिवसरा.
तसेच संचालक पदी मनोज मालु,
रविद्र कोठडिया,महेंद्र चोपडा, अभय कवाड,डॉ.प्रफुल दुग्गड़,
रितेश कवाड,जयदीप सेठ,
गणेश कोटेचा,विकास छाजेड
हरिश झाबक,अमरिश चतुरमुथा व नरेंद्र रुणवाल यांची निवड करण्यात आली.समाजाच्या सर्व स्तरातून नवीन पदाधिकारी आणि कार्यकारिणी चे अभिनंदन करण्यात येत आहे.

