शिरपूर तालुक्यात स्थिर सर्वेक्षण पथक तैनात
शिरपूर प्रतिनिधी - नंदुरबार लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासन सज्ज झाले आहे. शिरपूर तालुक्यात देखील शिरपूर तहसील कार्यालय अंतर्गत तहसीलदार महेंद्र माळी यांनी देखील तालुक्यात स्थिर सर्वेक्षण पथक तैनात करून वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
नंदुरबार लोकसभा मतदार संघा अंतर्गत शिरपुर विधानसभा मतदार संघामधे स्थिर सर्वेक्षण पथक सुरु करण्यात आले असून भावेर , पलासनेर अणि वाघाडी या तीन. ठिकाणी पथक नियुक्त केले आहेत .त्यांचे मार्फत शिरपुर हद्दीत येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
निवडणूक काळात कोणत्याही प्रकारे आचारसंहितेच्या भंग होऊ नये तसेच बेकायदेशीर कृत्य होऊ नये, मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम शस्त्रास्त्रे , इत्यादीचा वापर होऊन कायदा व सुव्यवस्था आबादी ठेवण्यासाठी व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सदरचे स्थिर सर्वेक्षण पथक तैनात केले असल्याबाबतची माहिती तहसीलदार महेंद्र माळी शिरपूर यांनी दिली आहे.



