आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न
शिरपूर प्रतिनिधी - आगामी काळात येणाऱ्या विविध धर्माचे सण उत्सव व निवडणूक व सध्या लागू असलेले आचारसंहिता त्या निमित्ताने आदर्श आचारसंहितेचे पालन व कायदा सुव्यवस्था आणि शहरातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना व विविध समस्या यावर विचार विनिमय करण्यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आज दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली.
या बैठकीचे अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी मंडलिक सो. यांनी स्वीकारले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस निरीक्षक के.के. पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सरोदे सर, नायब तहसीलदार पेंढारकर व शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीसाठी शिरपूर शहरातील सर्व धर्मीय नागरिक विविध राजकीय सामाजिक पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पी.आय. केके पाटील यांनी केले. आगामी काळात मोठ्या प्रमाणावर विविध धर्माचे सामाजिक सांस्कृतिक सण व जयंती साजरा होणार असून निवडणूक काळात आचारसंहिता सुरू असल्याने आदर्श आचारसंहितेचे पालन करून सलोख्याने व सामान्य शांततेच्या मार्गाने आपापले सण उत्सव साजरा करावे यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असे मत त्यांनी व्यक्त केले. व्यसन उत्सवाच्या काळात युवकांनी व्यसनमुक्त फोन उत्सव साजरे करावेत राष्ट्रपुरुषांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक भान जपावे, सोशल मीडियाचा वापर जागरूकतेने करावा, उत्सव करत इतर कोणत्याही धर्मीयांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, वाद्य वाजवताना काळजी घ्यावी, मोटर वाहन कायद्याचे पालन करावे, उत्सव काळातील विविध झेंडे व फलक लावली जातात त्यांची पावित्र्य राखावे अशा सूचना केल्या.
यावेळी नागरिकांकडून राजेश मारवाडी, राज्यात कुरेशी ,संजय पाटील, विजय राजपूत, गणेश सावळे, इ. समाज बांधवांनी आपले मनोगत व्यक्त करून उत्सव काळातील नियोजनासाठी प्रशासनाकडे काही प्रमुख मागणी केली.
अध्यक्ष भाषणात उप विभागीय अधिकारी मंडलिक यांनी नागरिकांकडून आलेल्या सूचनांचे स्वागत करून ते पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. शिवाय सण उत्सवाच्या काळात शांतता कमिटीचे सदस्य हे जबाबदार घटक असून जनता आणि प्रशासन याच्यातील ते प्रमुख किंवा असल्याबाबत देखील महत्वपूर्ण मत व्यक्त केले. उत्सव काळात पोलिसांना व प्रशासनाला सहकार्य करून शहरातील शांतता सुव्यवस्था कायदा व्यवस्थापन अबाधित ठेवून राष्ट्रपुरुषांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून साजरे करावे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पीएसआय सौ छाया पाटील यांनी केले.
