वृक्षमित्र शिवाजी राजपूत युएसए बुक ऑफ रेकॉर्डसने सन्मानित




वृक्षमित्र शिवाजी राजपूत  युएसए बुक ऑफ रेकॉर्डसने सन्मानित

शिरपूर- येथील वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांना ५ देशाची संघटना असलेली युएसए बुक ऑफ रेकॉर्डस् यात युएसए, युके, कॅनडा, फिलिपाईन्स आणि भारत या देशाची संघटनांनी त्यांना युएसए बुक ऑफ रेकॉर्डसने पुरस्कार दिला. त्यांनी दि.१/७/२०२२ पासून ते दि.१२/२/२०२४ पर्यंत ३४२८ लोकांचे वाढदिवस ८४८ रोपे, ९६८ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लावून साजरे केले आहेत. आलेले प्रमुख पाहुणे यांना २९२० रोपे मोफत वाटप केली आहेत असा त्यांनी एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

म्हणून त्यांना वरील देशाच्या संघटनांनी युएसए बुक ऑफ रेकॉर्डस् पुरस्कार देवून गौरविण्यात आले. असे काम करणारे वृक्षमित्र शिवाजी राजपूत हे एकमेव व्यक्ती आहेत. त्यांनी पर्यावरण संतुलनासाठी लाखो वृक्षांची लागवड करून संवर्धन केले आहे. २२ महिन्यांपासून प्रत्येक व्यक्तींच्या वाढदिवसाला रोप लावणे हा त्यांनी संकल्प केला आहे. मी करेल तर इतर सर्व व्यक्ती वाढदिवसाला वृक्ष लावून साजरे करतील, त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षाची लागवड होईल हा त्यामागील उद्देश आहे असे त्यांनी म्हटले आहे.

शिवाजी राजपूत हे लोकांच्या आयुष्याबरोबर हजारो वृक्षांना जीवनदान देत आहे. हेच वृक्ष हजारो लोकांचे आयुष्यमान वाढविणार आहेत.

शेती व्यवसायात देखील त्यांनी अभिनव प्रयोग करून बांबू लागवड विषयी नागरिकांना जागृत करून स्वतः विविध प्रजातींच्या बांबूंची लागवड केली आहे. तुमच्या या सर्व कामाची दखल घेत यापूर्वी देखील त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

 शिवाजी राजपूत यांची पर्यावरण क्षेत्रातील अतुलनीय कामाची दखल सर्व स्तरावरील संघटना घेत आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल पर्यावरण क्षेत्रातून सामाजिक राजकीय स्तरावरून अभिनंदन केले जात आहे. राज्य देश विदेश स्तरावरील अनेक मानाचे पुरस्कार मिळवणारे शिवाजी राजपूत हे पहिले व्यक्ती आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने