गाडीत होता कांदा मात्र पोलिसांच्या कारवाईने झाला वांदा बेकायदा बिअरची वाहतूक करणाऱ्या वाहनावर शिरपूर शहर पोलिसांची कारवाई




गाडीत होता कांदा मात्र पोलिसांच्या कारवाईने झाला वांदा

बेकायदा बिअरची वाहतूक करणाऱ्या वाहनावर  शिरपूर शहर पोलिसांची कारवाई


शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे कारवाई करत शहर पोलिसांनी कांद्यांच्या गोणीच्या आड बेकायदा बियर साठ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत एकूण ७,८८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गोपनीय बातमी प्राप्त झाल्या नंतर पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील यांनी लागलीच शोध पथकाचे अंमलदारांना शिरपुर टोल नाका येथे सापळा लावणेकामी पाठविले होते.  शिरपुर टोलनाका येथे दोन पंचांसोबत सापळा लावला असता सकाळी ०९.०९ वाजेचे सुमारास इंदोरकडून धुळेचे दिशेने पांढऱ्या रंगाचे पिक-अप वाहन क्र.एम.एच.०४/के.यु.६६४५ असे टोलनाक्यावर आले व टोल नाक्यातून धुळ्याच्या दिशेने जाण्यास निघत असतांना सदर वाहनाचे क्रमांकावरून सदरचे वाहन बातमोतील असल्याने शोध पथकाचे अंमलदारांनी वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला असता त्याने वाहन न थांबवता धुळयाचे दिशेने मुंबई- आग्रा महामार्गाने वेगाने चालवून नेत असतांना त्याचा संशय आल्याने त्याचा पाठलाग केला असता न्याने पिक-अप वाहन नापी नदीवरील पूल ओलांडून नरडाण्याचे दिशेने वेगाने चालवित नेत असतांना त्याचे वाहनाचा टायर फुटल्याने वाहन महामार्गावरून रस्त्याचे खाली उतरवून मातीच्या कच्च्या रस्त्याने झाडाझुडपांमध्ये चालवून नेत असतांना वाहन मातीत फसल्याने तो वाहन सोडून पळून गेल्याने सदरचे वाहन शिताफीने पकडले, वाहन चालकाचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. सदर वाहनाची पंचांसमक्ष झडती घेता सदर वाहनात कांद्यांच्या गोण्यांच्या आडोशास पु‌ठ्याचे खोके त्यात  विअरचा माल भरलेलेमिळून आले.
यात ५,००,०००/-रूपये किंमतीचे महिन्द्रा कंपनीचे बोलेरो पिक-अप वाहन क्र. एम.एच.०४/के.यु. ६६४५ पांढन्या रंगाचे जू.वा.कि.अं.

२,८८,०००/- रुपये किमतीचे १०० पुठ्ठ्याचे खोके प्रत्येक खोक्यामध्ये माऊंट्स ६००० ऑरोजिनल सुपर स्ट्रॉग बीअर असे नमूद असलेले टीन बिअरचे ५०० मिलीचे २४ नग प्रत्येकी नग १२०/- रूपये किंमत असलेला व सेल ईन मध्य प्रदेश ओनली  असलेला एकूण -७,८८,०००/- रुपये किंमत अंदाजे. असा मुद्दे माल हस्तगत करण्यात आला.

  पोकों/मनोज महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपुर शहर पो.स्टे. ला महाराष्ट्र प्रोव्हिबिशन कायदा कलम ६५(अई).८००१४२),८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास पोहेका / ललीत पाटील करीत आहेत.

 सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे तसेच प्रभारी उप विभागीय पोलीस अधिकारी तथा शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील, तसेच पोउनि हेमंत खैरनार, डी.थी, पथकाचे पहिंकों/ललीत पाटील, पांना रविंद्र आखडमल, पांकां/विनोद आखडमल, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे, मनोज महाजन, भटु माळुंके, सचिन वाघ, योगेश दाभाडे, आरीफ तडवी, चापोकों/विजय पाटील तसेच होमगार्ड शरद पारधी व मिथुन पवार अशांनी मिळून केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने