✓ लेख - 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
* भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आजचा तरुण*
✓ लेखक- कु. चंद्रकांत ताराचंद बोरसे थाळनेर
सर्वप्रथम मी चंद्रकांत बोरसे 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महामानवास अभिवादन करतो व आपणास या दिवसानिमित्त शुभेच्छा देतो.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू या गावी झाला असून त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ व आईचे नाव भीमाबाई सकपाळ असे होते त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाचा छंद होता तरीही त्यांना शिक्षणाची मुभा नव्हती तरी त्यांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला व 32 डिग्री प्राप्त केल्या.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारताचे पहिले न्याय मंत्री होते बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या व मागासवर्गीयांच्या उत्कर्षासाठी घालवले आज दलितांना जे स्थान प्राप्त झाले यांचे सर्व श्रेय बाबासाहेबांचे आहे बाबासाहेबानी दलितांना समानतेचा हक्क मिळवून दिला व जातीभेद संपवण्यासाठी संघर्ष केला
बाबासाहेब नेहमीच म्हणत होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा सर्वांनी शिक्षण घेतले पाहीजे शिक्षणाने मनाची व बुद्धीमत्तेची प्रगती होते व प्रयत्नाने त्या समाजाची प्रगती होते व आपल्यावर अन्याय होत असेल तर सर्वांनी संघटित होऊन त्याविरुद्ध संघर्ष केला पाहीजे ज्या गोष्टी एकट्याने साध्य होत नाही त्या गोष्टी साध्य करण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे हे डॉ. बाबासाहेबांनी शिकवलं नुकत्याच पंजाबमधील शेतकऱ्याच्या संघटनेमुळे सरकारला शेतकरी विरुद्ध कायदे मागे घ्यावे लागले हे सर्व कशाने शक्य झाले त्यांच्या संघटनेमुळे बाबासाहेब सर्व समाजाला नेहमीच सांगितले शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा
आपण किती जगतो आणि कसे जगतो याला महत्त्व नाही तर आपण आपले जीवन वाघासारखे जगलो पाहिजे शेळीसारखे अन्याय सहन करून जगण्यात अर्थ नाही तर आपण ज्ञान प्राशन करून वाघासारखा आपल्यावर होणाऱ्या अन्याया विरुद्ध गुरगुरले पाहिजे.
नुकतेच पप्रदर्शित झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर या सिनेमात हेच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला बाबासाहेबांचे असे अनेक विचार आहेत जे आपल्या सारख्या तरुणांना प्रेरित करतात पण आजचा तरुण या गोष्टी आत्मसात करतो का की फक्त जयंती आली म्हणून मिरवणुकीत उड्या मारायच्या याला काय अर्थ आहे आजचा तरुण हा व्यसनाच्या आहारी गेला आहे त्याला समाजाशी काहीही घेणं देणं नाही आजचा तरुण कोणावरही अन्याय करण्यास तयार आहे खरंच आपण संघटित आहोत का याचा विचार प्रत्येक समाजाच्या तरुणांनी केला पाहिजे खरंच आपण आपल्या वरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढतो का याचे चिंतन होणे गरजेचे आहे खरंच आपण महिलावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध वाचा फोडले का याचा विचार होणे गरजेचे आहे.
बाबासाहेब म्हणत गरीब म्हणून जन्माला आलो हा आपला दोष नाही पण मी मरतानाही गरीब म्हणूनच मेलो हा माझा दोष आहे खरच आपण गरिबीत जन्मला येतो पण आपण आयुष्यभर गरीबच का राहतो म्हणजे आपण आपले आयुष्य काही सुधारलेच नाही आपण शिक्षण घेऊन प्रगती करण्याच्या प्रयत्न केला नाही मग त्या जीवनाला काय अर्थ आहे खुप महत्वाचा संदेश बाबासाहेबांनी दिला आहे आपल्या लोकांच्या अंगात देवी, भूतच का येतात शिवाजी महाराज, अशोक सम्राट, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक यांच्या सारखे विचारवंत का येत नाहीत ? जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल,जय हिंद जय भारत..
लेखक
मो. 8275206792
Tags
news
